राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अभिलाषा रोकडे
![]()

राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अभिलाषा रोकडे
अमळनेर प्रतिनिधी:शिवाजी महाजन
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अभिलाषा भिला रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. बुधवार दि. २६ जुलै २०२३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही नियुक्ती केली. अभिलाषा रोकडे या नगरदेवळा ता. पाचोरा येथील रहिवासी आहे. त्यांनी या आधी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष आणि युवती जिल्हाध्यक्ष या पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. तसेच त्या अखिल भारतीय समता परिषदेच्या युवती जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अदिती तटकरे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल मंत्री अनिल भाईदास पाटील, संजय पवार, माजी आमदार दिलीप वाघ, कल्पना पाटील, रविंद्र पाटील, योगेश देसले,महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष शिवाजी महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

