ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी अपडेट राहणे गरजेचे…
सुहास रोकडे
जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव यांचे प्रतिपादन
![]()
ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी अपडेट राहणे गरजेचे…
सुहास रोकडे
जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव यांचे प्रतिपादन
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे तिन तालुक्यातील ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण





अमळनेर प्रतिनिधी
ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी ग्रंथालयाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती शासनाच्या ग्रंथालय विभागाच्या वेबसाईटवर भरणे बंधनकारक राहील व महत्त्वपूर्ण माहिती वेळेत न भरल्यास त्याला कर्मचारी जबाबदार राहील व ग्रंथालयाचे अनुदान वेळेवर येऊ शकणार नाही यासाठी ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी अपडेट राहणे गरजेचे आहे असे जळगाव जिल्हा ग्रंथालयाचे प्रमुख सुहास रोकडे यांनी मार्गदर्शन करतांना अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या ग्रंथालयांच्या कार्यशाळेत सांगितले…
सविस्तर माहिती अशी कि
दि.25/07/23 मंगळवार रोजी ग्रंथालय अनुदान प्रणाली जी यापुढे ग्रंथालयीन कामकाजात वापरणेत येणार असून त्याव्दारे ग्रंथालयाचे सर्व प्रकारचे अहवाल,कार्यक्रमांचे फोटो इ.प्रणालीवर ग्रंथपालांनी भरावयाचे आहे,त्यादृष्टीन अमळनेर,धरणगांव,चोपडा तालुक्यातील सर्व ग्रंथपालांसाठी यासंबधीच्या कार्यशाळा पू,सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या सहयोगाने म.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगांव यांनी आयोजीत केले होते. सदर प्रसंगी सन्मा.श्री.सुहास रोकडे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगांव व श्री.सुनिल जगताप,तांत्रिक सहाय्यक,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगांव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष,कार्यवाह तसेच अमळनेर, चोपडा,धरणगांव तालुक्याचे
अध्यक्ष,पू.सानेगुरुजी ग्रंथालयाचे विश्वस्त,संचालक हे उपस्थित होते.

