मणिपूर येथील अत्याचारातील महिलांना न्याय मिळावा यासाठी अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन
![]()

मणिपूर येथील अत्याचारातील महिलांना न्याय मिळावा यासाठी अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
भारताच्या महामहीम राष्ट्रपती आपणही एक महिला असून आपल्या देशात आजपर्यंत कधी न घडलेले व पाहिलेले महिलांवरील एवढे अत्याचार संपूर्ण भारतासह जगभरात विविध वृत्तपत्रात व सोशल मीडियाद्वारे सर्व जण पाहात असून अशा घटना घडत असतील तर हे भारत देशाची दुर्दैव आहे …मणिपूर येथील हिंसाचार, अत्याचार तेथील राज्य सरकार व केंद्र सरकारसह जगभरात नाव मोठे करणारे पंतप्रधान शांततेचे आव्हान करू शकले नाहीत.. त्यामुळे मणिपूर व केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.. त्वरित मणिपूर सरकार बरखास्त करून पीडित महिलांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदन देतेवेळी
सचिन पाटील गोकुळ बोरसे, श्रीकांत पाटील,श्याम पाटील, सुभाष पाटील, संदीप घोरपडे ,प्रताप शिंपी, मनोज शर्मा संदीप पाटील, जयवंतराव पाटील, नरेंद्र संदानशिव, संभाजी लोटन पाटील ,विजय पाटील, श्याम पवार, गजेंद्र साळुंखे ,सचिन वाघ, सुलोचना वाघ, उज्वला कदम, गोविंद सोनवणे ,संजय चव्हाण, कल्पना वानखेडे, मनीषा परब धर्मेंद्र मोरे, काशिनाथ पाटील, तुकाराम चौधरी, निळकंठ पाटील, धनगर दला पाटील, सुरेश किरण पाटील, संजय चव्हाण, गोविंदा सोनवणे सह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

