जुनी पेन्शन योजना संबंधी गठीत समितीने अहवाल त्वरित द्यावा.
– गुलाबराव पाटील
![]()

जुनी पेन्शन योजना संबंधी गठीत समितीने अहवाल त्वरित द्यावा.
– गुलाबराव पाटील
ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने 2005 पूर्वी नियुक्ती व 2005 नंतर अनुदानावर आलेल्या शाळेतील कर्मचारी तसेच 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ अमलात आणावी म्हणून दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप केला होता. संपाची दखल घेत शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व जुनी पेन्शन योजना याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली आहे. समितीला प्रथम तीन महिने नंतर 31 जुलै पर्यंत मुदत वाढ दिली.सदर समितीने आपला अहवाल मुदतीत द्यावा गठीत समितीला पुन्हा मुदतवाढ देऊन शासनाने वेळ काढू पणा करू नये.अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक परिषद आंदोलन छेडणारआहे. याकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी ,शिक्षण उपसंचालक ,शिक्षण संचालक,तसेच शालेय शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदयांना जुनी पेन्शन लागू करण्याकरिता समितीने अहवाल मुदतीत द्यावा. तसेच शासनाने त्यावर तात्काळ अंमलबजावणी करावी. या करिता मागणीचे निवेदन दिले .महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभागाच्या वतीने शिक्षण उपसंचालक संदीप संगवे साहेब यांना निवेदन दिले.कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील म्हणाले. शासन पाच वर्षे सेवा करणारे आमदार ,खासदार लोक प्रतिनिधींनी पेन्शन लागू करते परंतु 58 वर्ष सेवा करणारे 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद करते. किती मोठा मानवी अन्याय आहे . शासनाने याचा विचार करावा .निवेदन देते वेळी कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील ठाणे महानगर अध्यक्षा हेमलता मुनोत ,संघटन मंत्री गजानन भोसले, कल्याण महानगर चे कार्याध्यक्ष आप्पाराव कदम उपस्थित होते.

