डोंबिवली मध्ये कारगिल विजय दिनानिमित्त”रौप्य महोत्सवी वर्ष” भव्य रॅलीचे आयोजन
![]()


डोंबिवली मध्ये कारगिल विजय दिनानिमित्त”रौप्य महोत्सवी वर्ष” भव्य रॅलीचे आयोजन
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाऊन, रस्ता सुरक्षा दल,नागरी संरक्षण दल, सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन ला डोंबिवलीकरांकडून अभिनंदन आणि कौतुकाची थाप
ठाणे कल्याण( प्रतिनिधी ) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाउन, नागरी संरक्षण दल,ठाणे नवी मुंबई समूह यांच्या संयुक्त विद्यमाने,वाहतूक शाखेचे सहायक पोलिस उपायुक्त मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली , रामनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, यांचा नेतृत्वाखाली ,सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन चे विशाल शेटे, आणि आर एस पी अधिकारी युनिट चे मनिलाल शिंपी यांचा सहकार्याने २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते. जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याला कारगिल युद्धात तब्बल 11 आठवडे वाट बघून सोळाशे च्या वर सैनिक जखमी झाले होते. 527 सैनिक अमर झालेत व आपल्याला विजय मिळाला या विजय दिनाला आज 24 वर्षे पूर्ण झाली व 25 वर्षात रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण झाले. ह्या दिवसाची आठवण म्हणून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाउन व नागरी संरक्षण दल नवी मुंबई समूह ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगर पोलीस स्टेशन पासून सुरू करत अमर शहीद कॅप्टन विनय सचान स्मारक पर्यंत रॅली काढण्यात आली. रॅली ची सुरुवात रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाउन चे अध्यक्ष प्रदीप बुडडबाडकर व कोकण एकता प्रतिष्ठानचे संपादकीय अध्यक्ष भाई पाणवडीकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. या रॅलीमध्ये विविध शाळांचे 250 पेक्षा जास्त विद्यार्थी , शिक्षक वृंद, रोटरियन, रोट्रॅक्टर, एन एस एस स्टुडन्ट, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, के डी एम सी स्टाफ, व पोलीस डिपार्टमेंट तसेच रक्षक हनुमान चौधरी, शकुंतला राय, विद्या गडाख,
अशोक धंधा, अनिल शेलार इतर देश बांधव ही सहभागी होते. सूत्रसंचालन दीपाली बागुल यांनी केले.
बँड पथकाची धुरा ओंकार इंटरनॅशनल स्कूल केतन शिंपी व विद्यार्थ्यांनी सांभाळली. तसेच स्काऊट गाईडचे अशोक जगताप आणि जगदीश उगले, यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रॅली पार पडली. सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे विशाल शेट्टी यांनी मोठ्या उत्साहाने सर्व वाहतूक व्यवस्थापन केले. रस्ता सुरक्षा दलचे मनिलाल शिंपी यांनी मोलाचे सहकार्य देत शिक्षण विभाग कार्यक्रमाचे शोभा वाढावी यादृष्टीने शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नागरी संरक्षण दलाचे बिमल नाथवाणी व रोटरी क्लब डोंबिवली मिटवून मिड टाउन चे डॉ.किशोर अढळकर यांनी केले. स्मारक व स्मारक परिसर फुले व फुग्यांनी सुंदर सजवण्यात आला होता.
अमर शहीद कॅप्टन सचान यांच्या स्मारकाला मान्यवर नागरिक संरक्षण दलाचे
उपनियंत्रक विजय जाधव, राष्ट्रपती पदक सन्मानित Ex Dy Chief Warden Area 2 बिमल नाथवाणी, रोटरी क्लबचे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाउन चे अध्यक्ष प्रदीप बुडबाडकर, रस्ता सुरक्षा दलाचे समादेशक डॉ. मनिलाल शिंपी व स्काऊट गाईडचे अध्यक्ष अशोक जगताप तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली.
कारगिल विजय साजरा करणे म्हणजे नवीन पिढीला नवीन इतिहास रचण्याची प्रेरणा देण्याचा हा क्षण आहे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये व प्रत्येक भारतीयांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान जागवण्याबरोबरच कारगिल युद्धाच्या स्मृती जागवण्यासाठी व स्वातंत्र्यसेनाकडून मिळणारी ऊर्जा व नवे विचार व संकल्पना जागृत ठेवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्याचे आयोजित होते कारगिल विजय दीन साजरा करत सार्वजनिक ठिकाणी देशभक्तीचा प्रचार प्रसार वातावरण निर्मिती करण्याचा मानस आहे.डोंबिवली हे सांस्कृतिक शहर म्हणून मान्यता पावले आहे हाच वारसा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणादायी ठरण्यासाठी, संस्कृती रूपाने एकजुटीने आपण पुढेही असे उपक्रम घेणार आहोत असे मनोगत डॉ. किशोर अढळकर यांनी व्यक्त केले.उपस्थित सर्व मान्यवरांचे, शिक्षक बंधू भगिनींचे, कार्यक्रमाची शोभा खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे वाढली असे सर्व विद्यार्थी मित्रांचे डॉ. मनिलाल शिंपी यांनी आभार व्यक्त केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

