1 min read

पिंपरी चिंचवड क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न .

Loading

पिंपरी चिंचवड क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न .
समाजाचा आर्थिक,आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे::अभिजित भांडारकर.
पिंपरी चिंचवड,संकलन: ( मनिलाल शिंपी )श्री.क्षत्रिय अहिर शिंपी समाज पिंपरी चिंचवड विभागातर्फे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७३ वा संजीवन समाधी सोहळा , गुणवंत विद्यार्थी सत्कार व महाप्रसादाचा कार्यक्रम रविवार दि. १६ जुलै २०२३ रोजी खंडोबा माळ सांस्कृतिक भवन,आकुर्डी येथे अत्यंत उत्सवात व जल्लोषात साजरा करण्यात आला*
सौ. लीना मनोहर शिंपी.सदस्या सौ नितल अनिल शिंपी कु अंकिता अनिल शिंपी यांनी सुरेख रांगोळी काढली होती.
सर्वप्रथम प्रथम श्री.गणेश सोनूशेठ खैरनार यांनी सुमधुर अभंग गायन केले.
पुणे जिल्हा अध्यक्ष भटूलाल बागुल पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ कल्पना ब्राह्मणकर पिंपरी चिंचवड अध्यक्ष महेश वसंतराव जाधव व कार्याध्यक्ष महेश बोरसे सहकर्याध्यक्ष मनोहर शिंपी उपाध्यक्ष प्रवीण मांडगे, दिनकर शिंपी, सहदेव शिंपी, बाळासाहेब ब्राह्मणकर , किरण खैरनार अमोल जाधव यांच्या हातून श्री संत नामदेव महाराजांचे प्रतिमापूजन करण्यात आले. व प्रमुख पाहुणे यांनी दीप प्रज्वलन केले..
सौ चक्षुता कार्तिक जगदाळे व कु. मानसी महेश जाधव यांनी अतिशय सुंदर अशी गणेश वंदना सादर केली. त्यांची सुंदर नृत्य पाहून त्यांना छान बक्षीसही देण्याचा मोह प्रेक्षकांना आवरला नाही…
माजी महिला अध्यक्षा सौ रंजनाताई महेश जाधव यांनी आपले मनोगत अगदी छान शब्दात व्यक्त केले..
त्यानंतर समाज मुख्य कार्यकारणी महिला कार्यकारणी माजी अध्यक्ष संजय संदानशिव तसेच प्रमुख पाहुणे सर्व मिळून अतिशय उत्साहात सौ रंजनाताई जाधव यांना “कार्यगौरव” पुरस्कार देण्यात आला.
त्यानंतर नूतन महिला अध्यक्ष व कार्यकारिणी यांची निवड करण्यात आली. नूतन महिला अध्यक्ष सौ.रुपालीताई उमेशबाविस्कर यांची एकमताने निवड होऊन व सर्व नूतन महिला करिणीची निवड केली गेली व त्यांचा सत्कार करण्यात आला
*पिंपरी चिंचवड क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे समाज अध्यक्ष श्री महेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. अभिजीत भांडारकर सर यांनी कै. पार्वताबाई चंद्रकांत भांडारकर अमळनेर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री चंद्रकांत सिताराम भांडारकर व सौ वैशाली चंद्रकांत भांडारकर यांच्याकडून समाजातील गुणी विद्यार्थ्यांना रुपये 51000 देण्यात आले.ही रक्कम बँकेत एफडी ठेवून त्यावर येणारे व्यास दरवर्षी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यात त्या व्याजातून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचा मानस भांडारकर कुटुंबीयांचा आहे.
पुणे जिल्हा अध्यक्ष श्री भटूलाल बागुल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या खुमाजदार शैलीत सौ अर्चनाताई भांडारकर यांनी सुद्धा आपले मनोगत छानपणे व्यक्त केले..
प्रमुख पाहुणे अभिजीत भांडारकर यांनी आपले विशिष्ट शैलीत मनोगत व्यक्त केले गणित विषयाची सूत्र सोप्या भाषेत मांडणी करून सांगितले गाण्याच्या पद्धतीत सूत्र कमी वेळात सहज कशी पाठांतर करायचे या विषयी मार्गदर्शन केले आपल्या जीवनाचा प्रवास सांगितला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समाजाला संजीवन समाधी सोहळ्यासाठी जवळजवळ 61 समाजमावलींकडून त्या वेळपर्यंत पाचशे रुपये ते अकरा हजार एकशे अकरा पर्यंत देणगीदारांचे अतिशय आनंदाने श्री संत नामदेव महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले व सत्कार करण्यात आला.
मग कार्यक्रमात मध्यंतरी घेऊन सर्व समाज माउलींनी श्री संत नामदेव महाराजांचा महाप्रसाद खानदेशी भोजन
*पुरणपोळी ( मांडे ),साजूक तूप घालून..खीर, भजी रसई, वरण भात कुरडई पापड इ. व विड्याचे पान सुद्धा सर्वाना उपलब्ध होते.
अतिशय आनंदाने महाप्रसाद घेऊन समाज माऊली तृप्त झाली त्यात कार्यकारणी पदाधिकारी व महिला पदाधिकारी व सर्व पदाधिकारी यांनी वाढण्याची सेवा दिली.
उत्तरार्धत राहिलेल्या सर्व समाज माऊली देणगीदारांचे सत्कार करण्यात आले.
त्यानंतर बालगोपाल पहिली ते नववी विद्यार्थ्यांना समाज अध्यक्ष महेश जाधव यांच्यातर्फे बक्षीस वाटप करण्यात आले. त्यामुळे बालगोपाल खूपच आनंदी दिसत होते.
पुढील कार्यक्रमात या समाज माऊलीच्या लग्नाची 50 वर्ष पूर्ण झालेली त्या समाज मुलींचा सत्कार करण्यात आला..
ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या समाज माऊलींचा सत्कार करण्यात आला..
बारावी सायन्स मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी चि.दीपराज भिकन शिंपी 86.50 % गुण मिळवून उत्तीर्ण झाला,तसेच इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेली कुमारी अदिती भांडारकर 98.60% गुण मिळवून पास झाल्याबद्दल, दोघांना सतीश बागुल साहेब यांच्याकडून प्रत्येकी ५००० रुपये चां धनादेश देउन सत्कार करण्यात आला…
तसेच इतर दहावी व बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना समाजाकडून उत्कृष्ट प्रकारची फाईल देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला…
सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वाटपाचे काम सहसचिव सहदेव शिंपी यांनी उत्तम प्रकारे केले.
त्यानंतर बीसीएस एमसीएस डॉक्टर एमबीए इतर पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला..
दिपक चव्हाण आर्किटेक्चर यांनीही आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
*सहकार्याध्यक्ष मनोहर शिंपी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
माजी समाजा अध्यक्ष अशोक दगडू चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुधीर शिंपी, सतीश मनोहर बागुल, स्वप्निल प्रकाश बागुल CA रामकृष्ण शेठ वसंतराव निकुंभ, गिरीश सोनवणे, प्रवीण मांडगे, मनोहर सोनवणे, म का सदस्य तुकाराम शिंपी , अरुण खंडू शिंपी (कापडणे) सचिदानंद शिंपी,समीर भांडारकर. प्रशांत आहेर, पंकज जाधव. यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात सूत्रसंचालन सचिव .जी. एन. मेटकर आणि सौ. मयुराताई निकुंभ यांनी केले.
व परत शेवटी गणेश सोनू खैरनार यांनी अतिशय उत्तम अभंग सादर केला त्यानंतर सचिव गोपाळ मेटकर यांनी आभार व्यक्त केले.
सर्वात शेवटी व्यासपीठावर सर्वांनी पसायदान म्हटले व कार्यक्रमाची सांगता केली व कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली. पिंपरी चिंचवड कार्यकारणी, महिला मंडळ व युवा मंडळ यांनीही खूप मेहनत घेतली तसेच सर्वांचे खुप छान टीम वर्क दिसून आले.
श्री.क्षत्रिय अहिर शिंपी समाज पिंपरी चिंचवड कार्यकारणी, महिला मंडळ व युवा मंडळ नियोजन समितीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि समाज माऊलींचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *