आर्मी स्कूलमध्येे 24 वा कारगिल विजय दिवस साजरा…!
![]()

आर्मी स्कूलमध्येे 24 वा कारगिल विजय दिवस साजरा…!
अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे 26 जुलै हा 24 वा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील ,नायब सुभेदार भटू पाटील व बी.डी.पाटील होते. सर्वप्रथम कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमर जवान च्या प्रतिकृतीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या अर्धगोलाकृती पुतळ्याला माल्या अर्पण करण्यात आले. त्यानंतर देश सेवा करून आलेले सुभेदार मेजर नागराज पाटील व नायब सुभेदार भटू पाटील यांचा बुके देऊन सन्मान करण्यात आला.1999 मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान या कारगिल युद्धाचे प्रत्यक्षदर्शी नायब सुभेदार भटू पाटील यांनी तत्कालीन युद्ध परिस्थितीचे वर्णन आपल्या मनोगतात व्यक्त केले.प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नगराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी प्रेरित केले.प्राचार्य पी.एम. कोळी हे आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘जय जवान,जय किसान’ या घोषणेचे महत्व सांगतांना म्हणाले की, देशाची सेवा करणारे जवान आहेत म्हणून आपण येथे सुरक्षित वावरू शकतो.म्हणून सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जावनांचा आपण आदर केला पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
सांस्कृतिक विभाग प्रमुख शरद पाटील यांनी केले. तर संगणक शिक्षक व्ही.डी. पाटील यांनी आभार मानले.

