1 min read

महाराष्ट्रातील विमल गुटखा तस्करीची सूत्रे निझर येथून…
बेकायदेशीर गुटखा विक्री जोमात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Loading

महाराष्ट्रातील विमल गुटखा तस्करीची सूत्रे निझर येथून…
बेकायदेशीर गुटखा विक्री जोमात; प्रशासनाचे दुर्लक्ष

शहादा :- गुटख्यावर बंदी असतांनाही सर्रासपणे गुटख्याची विक्री होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खुलेआम विक्री होणाऱ्या गुटख्यावर पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
निझर येथून स्कार्पिओ, अशोक लेलँड सारख्या वाहनातून सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री करण्यात येत असल्याने व अगदी सहज मिळत असलेल्या गुटख्याच्या आकर्षणामुळे महिलांसह अल्पवयीन मुल-मुली व विद्यार्थी ही बळी पडत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे शहरात गुटखा विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची पाळेमुळे उखडण्याची गरज आहे.
राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतांनाही, मात्र ही बंदी झुगारून मोठ्या प्रमाणावर खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. शहरात एका होलसेल विक्रेत्या मार्फत छोटया-मोठ्या दुकानदारांना विक्रीसाठी माल पुरवला जात आहे. विशेष म्हणजे स्कार्पिओ व अशोक लेलँड या वाहनातून त्याची डिलिव्हरी दिली जाते. यावरून विक्रेत्यांना कुणाचीही भीती नसल्याचे स्पष्ट होते. शहरातील अवैध व्यवसाय बंद असल्याबाबत चर्चा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटखा विक्री सुरू झाली आहे. यात शहरांसह तालुक्यातील प्रत्येक लहान मोठा दुकानदार खुलेआम गुटख्याची विक्री करतांना दिसत आहे. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा गुटखा विक्रीकडे लक्ष घालून संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विध्यार्थी-पालकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *