1 min read

मणिपूरची घटना निर्भया पेक्षा अधिक लज्जास्पद-
जयसिंग वाघ

Loading

मणिपूरची घटना निर्भया पेक्षा अधिक लज्जास्पद
जयसिंग वाघ


जळगाव :- १६ डिसेंबर २०१२ ला
भारतात निर्भया हत्याकांड घडल्या नंतर काही तासातच सारा भारत पेटून उठला , केंद्र सरकार प्रचंड हादरले , सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली , मात्र या घटनेपेक्षा कितीतरी पटिने अधिक लज्जास्पद , घृणास्पद , मानवतेला व देशाला कलंकित करणारी घटना मणिपूर येथे दोन आदिवासी महिलां सोबत घडते ७५ दिवस त्याचा कुणालाच मागमुस लागत नाही ही बाब सर्वच दृष्टीने लज्जास्पद आहे असे रोखठोक विचार प्रसिद्ध साहित्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .
सत्यशोधक विद्यार्थि संघटने तर्फे जळगाव येथील काव्यरत्नावली चौकात आयोजित निदर्शने व निषेध सभेत वाघ बोलत होते. पाऊस सुरु असतांना सुद्धा लोक मोठ्या संख्येने हजर होते .
जयसिंग वाघ यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की , मणिपूरला जळते ठेवून प्रधानमंत्री परदेशात हार तुरे स्विकारत होते त्यांचे असे वागणे मानवताद्रोही असून लोकशाहिला काळीमा फासणारे आहे , मणिपूर मध्ये ८५ दिवसात सुमारे ३०० लोक मारले गेले , १५०० च्या जवळपास लोक जखमी झाले , अर्थव्यवस्था मोडकळीस आली , जनता भयभीत व असुरक्षित झाली आहे , ही परिश्थिति लक्षात घेता तिथं राष्ट्रपति राजवट लावली जावी अशी मागणीही वाघ यांनी केली .
मुकुंद सपकाळे यांनी मणिपूरची घटना म्हणजे लोकशाहीची हत्या आहे , ती घटना सर्व मानवतेला काळीमा फासणारी आहे , समस्त स्त्री वर्गाची विटंबना असून त्याचा निषेध करावा तेवढे थोडेच आहे या प्रश्नी सर्व भारतियांनी एक दिलाने एकत्र येवून संघर्ष करावा तसेच तिथल्या मुख्यमंत्री व केंद्रीय गृह मंत्री यांनी राजीनामा द्यावा असे विचार व्यक्त केले .
डॉ. करीम सालार यांनी मणिपूर येथील महिलांची जी विटंबना करण्यात आली , जी जीवित व वित्तीय हानी करण्यात आली ती भारतीय परंपरेला काळीमा फासनारी आहे , तिथं कायदा व सुव्यवस्था काहीच शिल्लक राहिली नसून तिथं राष्ट्रपति राजवट शिवाय दूसरा पर्यायच नाही असे सांगितले .
या प्रसंगी प्रा. देवेंद्र इंगळे , प्रा. सी. पी. लभा ने , प्रा. जयंत मगर , प्रा. कॄष्णा वळवी , प्रा. साहेब पडालवार , प्रा. गणपत धुमाळे , प्रा. जयेश पाडवी , प्रा. वकार शेख , सचिन धांडे , फाहिम पटेल , सुधाकर पाटील , सुष्मिता भालेराव , भरत कार्डिले , अविनाश तायड़े , नेहा पाटील , स्वप्निल गायकवाड़ , अजय पाटील , शरद सोनवणे , नेहा पवार , केतन शिरतुरे , चंचल धांडे , जयेश सोलंके , वैशाली कोळी , प्रतीक झनके , मुकेश राढोड , संघपाल डोंगरे सह विदयर्थी मोठ्याप्रमाणात हजर होते .
निषेध सभे नंतर मुकुंद सपकाळे यांनी प्रधानमंत्री , गृहमंत्री यांच्या विरोधात तसेच संविधान व लोकशाही समर्थनार्थ घोषणा दिल्या त्या नंतर मणिपूर घटनेच्या विरोधात सह्या घेण्यात आल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *