वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस समारंभ व बी एस पाटील यांचा सत्कार संपन्न
![]()

वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस समारंभ व बी एस पाटील यांचा सत्कार संपन्न
युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त अमळनेर तालुका पातळीवर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या बक्षीस समारंभाचे अध्यक्ष मा हरी भिका वाणी चेअरमन जी एस.हायस्कूल ,अमळनेर हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ लिलाधर पाटील व शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे होते. वक्तृत्व स्पर्धा लहान व मोठ्या अशा दोन गटात घेण्यात आली होती. लहान गटात प्रथम बक्षीस- आकांक्षा राजेश पाटील( रु15 75 स्मृति चिन्ह व प्रमाणपत्र )दुसरे-- देवयानी रुपेश साळुंखे (रू10 75 स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) तृतीय --मयूर गजानन पाटील ( रू775 स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) उत्तेजनार्थ- १) रिया उमेश मनोरे(रू 575 स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) उत्तेजनार्थ -२) भाविका सुरेश वाल्हे (रू500 स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) मोठा गट -वरील प्रमाणेच बक्षीस रक्कम, स्मृति चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्रथम-- सुमित राजेंद्र महाजन, द्वितीय --निर्भय धनंजय सोनार, तृतीय --चेतना जितेंद्र पाटील ,उत्तेजनार्थ १)प्रियंका बारी उत्तेजनार्थ -२) पूजा हरिलाल पाटील. सर्व सहभागी स्पर्धांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीसांचे प्रायोजक - प्रशांत निकम, मा.प्राचार्य प्रमोद पवार ,जितेंद्र झाबक, मा. प्राचार्य एम एच शिंदे, विजय बोरसे ,बापूराव ठाकरे, स्नेहा संदानशिव व प्रा.डॉ.लीलाधर पाटील हे होते. जी एस हायस्कूलचे बी .एस. पाटील हे मुख्याध्यापक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी केले ,तर संचलन डी ए पाटील यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक प्रा डॉ लीलाधर पाटील व रामेश्वर भदाणे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले .बापूराव ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी श्याम पाटील, डी एम पाटील, चिखलोदकर साहेब, रणजीत शिंदे, प्रेमराज पवार ,संजय सूर्यवंशी ,योगेश पाटील व स्पर्धकांचे पालक आणि जी. एस. हायस्कूलचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

