2024 च्या निवडणुकीपूर्वी 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटेल – श्री वितेश खांडेकर
![]()
जुन्या पेन्शन साठी जुनी पेन्शन कोअर कमिटी मुंबईत दाखल



2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन द्यावी लागणार– श्री विश्वास काटकर_ 👉2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन मिळावी म्हणून महाबेमुदत आंदोलनापासून सातत्याने मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक आदरणीय *विश्वास काटकर साहेब* यांच्याबरोबर आम्ही मीटिंग घेऊन चर्चा व सातत्याने पाठपुरावा करत आहोत. 25 जुलै 2023 आजच्या चर्चेमधून काटकर साहेबांच्या मतानुसार शासन लवकरच आपल्या 2005 पूर्वीच्या संदर्भात निर्णय घेणार आहे.
2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2023च्या G R मध्ये जे लाभ दिले आहेत ते NPS धारक म्हणून दिलेले आहेत. त्यामुळे आपण OPS धारक असल्यामुळे आपल्या ला 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना ते लाभ देत नाही. परंतु शासन याबाबतीत जुन्याच पेन्शन संदर्भात निर्णय घेतील असे काटकर साहेब यांनी सांगितले आहे.
2024 च्या निवडणुकीपूर्वी 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटेल – श्री वितेश खांडेकर
👉OPS संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री वितेश खांडेकर म्हणाले येणाऱ्या काळामध्ये विविध संघटनेच्या माध्यमातून जुन्याच पेन्शन संदर्भात आंदोलनाच्या रणनीती ठरवल्या आहेत.
गट तट व श्रेयवादाला थारा देऊ नये –सौ संगीता ताई शिंदे__
👉शिक्षण संघर्ष संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या अध्यक्षा सौ संगीता ताई शिंदे यांनी असे आव्हान केले की, श्रेयवादा मुळे एकाच प्रश्नासाठी गटतट निर्माण न करता, समन्वय साधून येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीच्या अगोदर, शासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.
शिक्षण विभागातील 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न- प्रा. दिलीप डोंगरे, श्री सुदेश जाधव सर ,रामचंद्र केळकर सर

