श्री दत्त सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय शिरूड येथे वाचन दिवस पंधरवडा साजरा
![]()

श्री दत्त सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय शिरूड येथे वाचन दिवस पंधरवडा साजरा
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक22/07/ 2023 रोजी शिरूड येथे श्री दत्त सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय शिरूड तालुका अमळनेर यांच्या माध्यमातुन शासकीय आदेशानुसार वाचन दिवस वाचन पंधरवडा वाचन महिना दिनांक 19/06/2023 ते दिनांक 18/07/2023 साजरा करण्यात आला यादरम्यान ग्रंथालयाच्या माध्यमातुन विविध उपक्रमाचे आयोजन करणे बाबत शासन आदेशाचे पालन करून शिरूड च्या श्री दत्त वाचनालयाच्या माध्यमातुन वरील तारखेच्या दरम्यान ग्रंथ देवघेव करणे तसेच वाचन संस्कृतीत वाढ होणे बाबतच्या उपक्रमात अंतर्गत विशेष वादविवाद व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले तसेच माध्यमिक शाळा श्री विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल शिरूड तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा शिरूड यांच्या विविध उपक्रमांतर्गत शालेय निबंध स्पर्धा मोठा गट निबंध स्पर्धा लहान गट तसेच वकृत्व स्पर्धा मोठा गट व लहान गट चित्रकला स्पर्धा मोठा गट व लहान गट आणि जिल्हा परिषद मराठी शाळा शिरूड येथून शुद्धलेखन स्पर्धा मोठा गट तसेच उत्तेजनार्थ बक्षीस लहान गट अशा प्रकारचा कार्यक्रमाचा समारोप समारंभाच्या कार्यक्रमात प्रसंगी श्री विनायकराव झिपरू हायस्कूल शिरूड यांच्या प्रांगणात बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आण्णासाहेब बन्सिलाल भागवतराव गुरुजी माजी केद्रप्रमुख अमळनेर होते तर
प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच भाईदास पितांबर पाटील तसेच ग्राम विकास शिक्षण संस्था मुळी चे डायरेक्टर श्री जयवंतराव अमृतराव पाटील व इतर पाहुण्यांचे स्वागत व प्रस्ताविक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री शशिकांत रघुनाथ पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमान जी व्ही बागुल सर यांनी केले तसेच कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थितीत होते.उपस्थित विद्यार्थ्यांना मधून विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन त्यांचा पुष्पगुच्छ व देऊन गुणगौरव करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी तसेच जिल्ह्यातील ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षा सन 2022 मध्ये घेण्यात आलेल्या जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सौ चेतना चेतन पाटील यांचा सत्कार सौ शिंदे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला तसेच कार्यक्रमास ग्रामस्थ व पदाधिकारी म्हणून काळू नाना पाटील, भालेराव उत्तम पाटील, विजय हिम्मतराव पाटील, डॉक्टर के पी पाटील, भाऊराव बाबुराव पाटील,भाऊसाहेब पाटील, नितीन पाटील, वसंतराव भगवान पाटील, भाईदास पाटील, विजय बोरसे, आबा कासार, शांताराम कोळी, दीपक मिस्तरी, पंकज पाटील, हिरामण पाटील, पुंजू पाटील, आनंदराव पाटील, भास्कर पाटील, सुकलाल पाटील, अशोक महाजन वगैरे ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यात आला कार्यक्रमाचा समारोप व आभार संस्था अध्यक्ष श्री शशिकांत पाटील यांनी केले व कार्यक्रम संपला असा जाहीर केले

