संत सावतामाळी सेवा मंडळ भाजी मार्केट अमळनेर आयोजित “भव्य गुणगौरव”समारंभ संपन्न……
![]()

संत सावतामाळी सेवा मंडळ भाजी मार्केट अमळनेर आयोजित “भव्य गुणगौरव”समारंभ संपन्न……
दि.२३जुलै२०२३रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त संत सावतामाळी सेवा मंडळ भाजी मार्केट अमळनेर आयोजित भव्य गुणगौरव समारंभ क्षत्रिय काच माळी समाज मढी, अमळनेर संपन्न झाला,समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा .श्री.आनंदराव माळी,चोपडा(नवनियुक्त दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ) प्रमुख अतिथी -मा .श्री.रविंद्र पुंडलिक महाजन (राज्यकर अधिकारी सेवाकर(GST) कार्यालय जळगाव)मा .श्री.रविंद्र भगवान माळी(मंडल अधिकारी हातेड भाग ता.चोपडा)मा .श्री.संतोष खुशाल महाजन, कोथरुड, पुणे (पुढारी वर्तमानपत्र कार्यकारी एक्झिटीव्ह आॅफिसर,पुणे) मा .श्री.लक्ष्मण पांडुरंग महाजन (संचालक -दि.अर्बन बॅक, अमळनेर)मा .श्री.मनोहर महाजन सर (अध्यक्ष -क्षत्रिय माळी समाज अमळनेर)मा .सौ.मंगलबाई रतनलाल चव्हाण (अध्यक्षा-क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ अमळनेर)मा,श्री.मोतीलालजी जैन(महावीर एम्पोरियम, अमळनेर) मा.श्री.गणेश शंकर महाजन (अध्यक्ष-संत सावतामाळी सेवा मंडळ)मा.श्री.जगदिश हिंमत महाजन (उपाध्यक्ष -सेवा मंडळ)यांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षा,१०वी,१२वी,पद्ववी, पद्ववी त्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.या प्रसंगीश्री.राहुल महाजन (शाखा व्यवस्थापक,स्टेट बॅक, जळगाव)यांचा कर्तव्यावर असताना दाखवलेल्या शौर्या बद्दल विशेष सत्कार,सेवा मंडळ, क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या कडून करण्यात आला.मा.रविंद्र महाजन व श्री.रविंद्र माळी यांनी आपल्या मनोगतात स्पर्धा परीक्षा साठी मेहनत व अभ्यासात सातत्य ठेवण्या विषयी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगतात,श्री.आनंदराव माळी साहेब यांनी आपल्या मनोगतात कठोर परिश्रम केल्याशिवाय सामाजिक व्यासपीठ प्राप्त होत नसते.म्हणुन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून अभ्यास करावा असा मौलिक सल्ला दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.प्रा.डाॅ.एस.ओ.माळी सर यांनी तर ईशस्तवन व स्वागतगीत सौ.मनिषा महाजन सौ.चित्रकला महाजन सौ.रंजना महाजन यांनी गायले सूत्रसंचालन श्री.गणेश पंढरीनाथ महाराज सर,व श्री.प्रा.डाॅ.सुभाष महाजन सर यांनी केले.आभार श्री.अॅड,सुदाम श्रावण माळी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत सावतामाळी सेवा मंडळाचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, समाजातील सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य,माळी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते……

