1 min read

नविन शैक्षणिक धोरणामुळे भारत महासत्ता होणार- डॉ निलेश रेवगडे

Loading

नविन शैक्षणिक धोरणामुळे भारत महासत्ता होणार- डॉ निलेश रेवगडे

छत्रपती शिक्षण मंडळाने शिक्षकांसाठी आयोजित केली कार्यशाळा

ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) नव्या युगासाठी तंत्रज्ञानाधिष्टीत जागतिक बदलांना देशाला सज्ज करण्यासाठी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणक्षेत्रात क्रांती घडविणार असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिक्षण मंडळाचे सरचिटणीस डॉ निलेश रेवगडे यांनी केले
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित पडघा येथील शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत डॉ रेवगडे बोलत होते.
छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण “या विषयावर शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री भालेराव सर यांनी केले तर विद्यार्थी ,शिक्षक व पालक यांच्यासाठी या कार्यशाळेचा फायदा कसा आहे यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन संस्थेचे सरचिटणीस माननीय डॉक्टर श्री रेवगडे सर यांनी शिक्षकांना
अतिशय सुश्राव्य भाषेत करून दिले . तज्ञ मार्गदर्शक सौ उर्मिला जाधव व श्री बगाड सर यांनी पुन्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीपीटी द्वारे राष्ट्रीय शिक्षणाची वैशिष्ट्ये हे विद्यार्थी ,पालक आणि शिक्षक यांच्यासाठी कसे फायद्याचे आहे यांची भूमिका व जबाबदारी, त्याचप्रमाणे हे शैक्षणिक धोरण कौशल्य विकास व रोजगार विमुख कसे आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरणात होणार असलेले बदल व शिक्षकाची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री चिंधे सर यांनी केले तर सांस्कृतिक प्रमुख श्री आर .पी .पवार सर यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *