1 min read

वाढीव टप्पा देण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे आश्वासन

Loading

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समिती
वाढीव टप्पा देण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे आश्वासन

मुंबई,ठाणे,. ( मनिलाल शिंपी ) महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समितीचे प्रमुख उपस्थित असलेले पदाधिकारी यांनी आज विधानभवनात मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली, व राज्यातील विनाअनुदान शाळांच्या सर्व प्रश्नाबाबत चर्चा केली, त्यात प्रामुख्याने प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक, 20 टक्के,40 टक्के, व 60 टक्के शाळांना पुढील वाढीव टप्पा देण्यात यावा कारण अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी निवृत्त होत आहेत, 2016 पासून टप्पा जर प्रत्येक वर्षी वाढत गेला असता तर आज सर्व शाळा 100 टक्के अनुदानित झाल्या असत्या,पण आम्हाला वाढीव टप्या साठी दरवर्षी आंदोलन करावे लागत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे,
तसेच यामध्ये काम करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवा संरक्षण हे 100 टक्के अनुदानित शाळेमध्ये जसे मिळते तसे मिळणे आवश्यक आहे,
तसेच शेवटच्या वर्गातील पटसंख्या ग्राह्य धरून चालणार नाही ही अट शिथिल करणे आवश्यक आहे, कारण दरवर्षी मुले असतात पण एखाद्यावर्षी मुले कमी झाली तर ती शाळा अपात्र करणे योग्य नाही,
तसेच पुणे व अन्य जिल्ह्यामध्ये आवक जावक नोंदी व शालार्थ आय डी बाबत अनेक अधिकारी टाळाटाळ करत असून शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम अधिकारी करत आहेत, जे मुद्दे सांगितले आहेत त्यांची पूर्तता केली असली तरी मुद्दाम काही अधिकारी यांनी लोकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे,
मुख्याध्यापक पद संरक्षित असताना देखील त्या ठिकाणी शाळाच अपात्र करत आहेत,
असे अनेक प्रकार सुरू असून याकडे आपण लक्ष द्यावे ही विनंती केली
त्यावेळी मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व प्रश्न शांतपणे ऐकून घेतले व याबाबत लवकरच मा .शिक्षणमंत्री यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्याबाबत सुचना दिल्या व हे सर्व प्रश्न लवकरच सोडवू असा शब्द दिला,
जे अधिकारी नाहक शिक्षकांना त्रास देत असतील ,व जाणीवपूर्वक काही बाबी करत असतील अशा अधिकाऱ्याच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले, याबाबत शिक्षणमंत्री महोदय यांच्या बरोबर चर्चा करू असे सांगितले, यावेळी मा .मुख्यमंत्री यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना म्हणाले ही सर्व जबाबदारी तुमची आहे, तुम्ही पुढे होऊन
मीटिंग ची जबाबदारी तुम्ही घ्या, हा विषय सोडवू,
या भेटीसाठी मा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन मा मुख्यमंत्री यांची भेट घालून दिली त्याबद्दल त्याचे मनापासून धन्यवाद,
सकाळ पासून मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयंत आसगावकर,आमदार कपिल पाटील, यांना भेटून आमचे प्रश्न लवकर सोडवावे ही विनंती केली,
सकाळ पासून मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आमदार जयंत आसगावकर व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रयत्न केला
मुख्यमंत्री भेटीवेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार निरंजन डावखरे ,आमदार कपिल पाटील, संघटनेचे पदाधिकारी संजय डावरे,सोलापूर चे संग्राम कांबळे, भानुदास गाडे, सावंता माळी, संभाजी आडुरकर,हे विधानभवनात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *