करुणामय बुद्धाच्या प्रकाशात जीवन मुल्यांच्या आदर्श प्रेमाची अस्सल अनुभूती पुष्पा साळवे यांची कविता देते
पुष्पा साळवे लिखित ‘ मनाच्या व्यथा ‘ कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.श्रीपाल सबनीस यांचे गौरवोद्गार
![]()


करुणामय बुद्धाच्या प्रकाशात जीवन मुल्यांच्या आदर्श प्रेमाची अस्सल अनुभूती पुष्पा साळवे यांची कविता देते
[ पुष्पा साळवे लिखित ‘ मनाच्या व्यथा ‘ कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.श्रीपाल सबनीस यांचे गौरवोद्गार ]
‘
करुणामय बुद्धाच्या प्रकाशात जीवन मूल्यांच्या आदर्श प्रेमाची अस्सल अनुभूती पुष्पा साळवे यांची कविता देते.’ असे गौरवोद्गार माजी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.कवयित्री पुष्पा साळवे लिखित ‘ मनाच्या व्यथा ‘ कविता संग्रहाचे प्रकाशन अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जळगाव येथे रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे असून प्रमुख अतिथी सर्वश्री आमदार राजू मामा भोळे ( जळगाव ),महापौर जयश्रीताई महाजन ( जळगाव महानगरपालिका ), उपमहापौर कुलभूषण पाटील,ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ,कवयित्री पुष्पा साळवे,डॉ.मिलिंद बागुल ( जिल्हाध्यक्ष,सत्यशोधक साहित्य परिषद ), काव्यसंग्रहाचे प्रकाशक युवराज माळी ( अथर्व प्रकाशन ) मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कवयित्री पुष्पा साळवे आपल्या मनोगतात म्हणाल्या की,’ समस्त अन्यायग्रस्त स्रियांची दुःख – वेदना समजून घेत साहित्यिकांनी निर्भयपणे माध्यमा समोर मांडल्या पाहिजे. डॉ.बाबासाहेबांचा क्रांतिकारी विचार हा प्रत्येक नागरीकाचा आचार बनला पाहिजे.’ प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमा पूजनानंतर महापौर जयश्री महाजन,डॉ.सबनीस यांचेसह मान्यवरांनी दीप प्रज्ज्वलन केले.आमदार राजू मामा भोळे मार्गदर्शनात म्हणाले की,’ पुष्पा साळवे यांची कविता कष्टकरी, बळीराजा,पिडीत स्त्रियांचे सक्षम प्रतिनिधित्व करते.’ उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी कविता समाजप्रबोधनपर असल्याचे स्पष्ट केले.महापौर जयश्री महाजन मार्गदर्शनात म्हणाल्या ,’ पिडीतांच्या वेदना शब्दात टिपून त्यांना मनोबल देणारी प्रेरक कविता आहे.जयसिंग वाघ म्हणाले की,’ बुद्धीवादयांची तटस्थता व राजकारण्यांची स्वार्थी संवेदनशून्यतेत अत्याचाराची बीजे फोफावतात. समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात मुकुंदभाऊ सपकाळे म्हणाले की,’ गतीमान विकासाचा डंका पिटणाऱ्या राज्यकर्त्या शासनाला मणिपूरला भर रस्त्यात राक्षसीपणे होणाऱ्या जात्यांध बलात्कार व नृशंस हत्येचा जाब प्रत्येकाने विचारला पाहिजे.’
डॉ.श्रीपाल सबनीस यांनी कवयित्री पुष्पा साळवे यांच्या कवितेची सांगितलेली वैशिष्ट्ये : –
- जात्यांध सवर्ण व सताधारी प्रस्थापितांची गुलामगिरी करीत भरकटणाऱ्या दिशाहीन चळवळीला जागृत करून दिशा व नवचैतन्य देते
- जाती धर्माच्या पलीकडे जाऊन महापुरुषांची बेरीज करून मानवतेच संचित जमा करणारी निष्ठावंत व्यापक भुमिका असणारी कविता
- वैयक्तिक दुःख व संस्कारांचं पुण्य लाभल्याने वैश्विक दुःखाला कवटाळणारी समाजाभिमुख संस्कारक्षम कविता
कार्यक्रमास कुमूद प्रकाशनाच्या संचालिका संगिता माळी,सौ.ललिता सबनीस,पार्वताई साळवे,पत्रकार रविंद्र मोराणकर,विजया बाविस्कर,संदिप भालेराव,प्रा.देवानंद साखला मॅडम,सुभाष साळवे,सिमा जाधव,भारती पाथरकर,रविंद्र बाविस्कर, मंगल अण्णा पाटील,यांसह साहित्यिक व आप्तेष्ट उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ.मिलिंद बागुल,डॉ. सबनिस यांचा वाड़मयीन परिचय डॉ.सुषमा तायडे आणि मनोगत शशिकांत साळवे यांनी व्यक्त केले.सुत्र संचलन प्रा.डॉ.प्रदिप सुरवाडकर व आभार प्रदर्शन विजय लुल्हे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यशोधकी साहित्य परिषद जिल्हा शाखेचे सदस्यांनी अमूल्य सहकार्य केले.

