उल्हासनगर येथील लोकसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लोकसारथी अमृत महोत्सव पुरस्कार २०२३ प्रदान…..
![]()
उल्हासनगर येथील लोकसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लोकसारथी अमृत महोत्सव पुरस्कार २०२३ प्रदान…..अमळनेर प्रतिनिधी-भूषण महाजन
जादूगार पी. बी. हांडे सोशल फौंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक विभाग यांच्या वतीने शिर्डी साईनगर येथील साई गोल्ड इन हॉटेलच्या सभागृहात संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्य, ध्येयनिष्ठ, प्रामाणिकपणा, त्यागपूर्ण व सकारात्मक दृष्टिकोन तसेच देशाचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, एकात्मता टिकविण्यासाठी व स्वावलंबी समाज घडविण्यासाठी केलेल्या बहुमोल योगदानाबद्दल उल्हासनगर येथील लोकसेवक, साहित्यिक लेखक व कवी, मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष, जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी चे कौन्सिल सदस्य तसेच ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लोकसारथी अमृत महोत्सव पुरस्कार २०२३ बीजमाता पदमश्री राहीबाई पोपेरे, सुरेशराव कोते कार्यकारी संचालक लिज्जत पापड, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे व भाऊराव मंडलिक जेष्ठ पत्रकार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. शांताराम कारंडे समाजसेवक व जादूगार पी. बी. हांडे उपस्थित होते.


