1 min read

समाज चिंतामणी, दानशूर दातृत्व,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. मनिलाल शेठ शिंपी (कल्याण) यांची जळगाव शहर शिंपी समाजातील विविध संस्था पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट, समाजहिताचा गोष्टींविषयी साधला संवाद!

Loading

समाज चिंतामणी, दानशूर दातृत्व,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. मनिलाल शेठ शिंपी (कल्याण) यांची जळगाव शहर शिंपी समाजातील विविध संस्था पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट, समाजहिताचा गोष्टींविषयी साधला संवाद!

अखिल भारतीय स्तरावर दानशूर दातृत्व म्हणून ज्यांचा गौरवाने व आदराने उल्लेख केला जातो तसेच मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख अखिल भारतीय स्तरावर शिवणयंत्र समाजातील गरजू गरीब लोकांना देण्याचा ज्यांनी विक्रम नोंदविला असे सर्वांचे लाडके समाजसेवक मनिलालशेठ शिंपी यांनी आज जळगाव येथे सदिच्छा भेट दिली यावेळी जळगाव येथील सर्व संस्थांचे पदाधिकाऱ्यांशी त्यांनी मनमोकळेपणाने व समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा विचारविनिमय केला यावेळी अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी तसेच अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे सहसचिव संजय रामकृष्ण जगताप यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच त्यांच्यासोबत आलेले डॉक्टर प्रकाश भांडारकर अरविंद नेरपगार व मनोहर शेठ शिंपी यांचे सुद्धा स्वागत श्री बाळकृष्ण देवरे अध्यक्ष नामविश्व शिंपी समाज फाउंडेशन तसेच सुजित जाधव नाना कापडणे एकता बहुउद्देशीय शिंपी समाज संस्था जळगाव व चेतन पवार अध्यक्ष श्री संत नामदेव संस्कार शिंपी समाज फाउंडेशन यशवंत शिंपी अध्यक्ष पिंप्राळा शहर शिंपी समाज यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केले यावेळी झालेल्या मार्गदर्शनपर मनोगतामध्ये शिवाजीराव शिंपी संजय जगताप सुजित जाधव तसेच सौ सारिका ताई शिंपी महिला मंडळ अध्यक्ष यांनी आपले विचार मांडले यावेळी डॉ. मनिलाल शेठ शिंपी यांनी आपल्या एक तासाच्या मनोगतामध्ये समाजातील विविध विषयावर आपले परखडपणे विचार या ठिकाणी मांडले व सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्याशी त्यांनी सामाजिक स्तरावर असलेल्या विविध विषयावर चर्चा केली. सर्व संस्थेच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे याची त्यांनी यावेळी खात्री दिली. सदरच्या औपचारिक कार्यक्रमाला जळगाव शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली त्यात प्रामुख्याने नानाभाऊ कापडणे शरद कापुरे संदीप जगताप योगेश शिंपी निलेश कापुरे शरदराव कापडणे प्रमोद कापुरे आनंद शिंपी कुणाल बागुल सतीश सोनवणे श्रीराम सोनवणे प्रशांत कापुरे भूषण निकम परेश जगताप प्रशांत सोनवणे मेहरून दीपक शिंपी किशोर निकुंभ रमेश मामा बोरसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी अरविंद नेरपगार मुंबई यांनी मनोगत व्यक्त केले व सुजित जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *