1 min read

प्रथमता महिला महापौर सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी व पोलीस प्रशिक्षण केंद्रा तर्फे लळींग किल्यावर जाऊन राबवली स्वच्छता मोहीम

Loading

प्रथमता महिला महापौर सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी व पोलीस प्रशिक्षण केंद्रा तर्फे लळींग किल्यावर जाऊन राबवली स्वच्छता मोहीम

धुळे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दिलेला स्वच्छतेचा संदेश जनतेने अमलात आणावा म्हणून, सौ प्रतिभाताई चौधरी या पहिल्या महिला महापौर ज्यांनी, लळींग किल्ल्यावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवली. धुळे शहरातील लळींग किल्ल्यावर पहिल्यांदाच महापौर पदावर असलेल्या व्यक्तींनी आणि पोलीस प्रशिक्षित ट्रेनिंग साठी आलेल्या कॉन्स्टेबलच्या पदासाठी असलेल्या, प्रशिक्षित व्यक्तींनी, लळींग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. त्या मोहिमेत स्वतः महापौर आणि सर्व पोलीस बांधव यांनी, सक्रिय सहभाग घेतला.
धुळ्यात पहिल्यांदाच असे घडले की, महापौर सौ प्रतिभाताई चौधरी व पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने, लळींग किल्ल्यावर थेट वरती जाऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच, किल्ल्यावरून खाली उतरतांनाही, वाटेत असलेला कचरा गोळा करून, हि वाटही स्वच्छ करण्यात आली. सर्व कचरा एका ठिकाणी गोळा करण्यात आला. प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांच्या सहकार्याने रापोनि चौधरी साहेब, प्रशिक्षक कुणाल भारती पोहवा, इमरान कुरेशी पोना, तानाजी पवार आणि नवप्रविष्ठ पोलिस शिपाई, अशा 100 लोकांची टीम यांच्यासोबत लळींग किल्ला येथे जाऊन, महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी, साफसफाई अभियान राबविले. याच्यामध्ये नारळाच्या सालपट तसेच प्लास्टिकच्या कॅरीबॅग व पॉलिथिन मोठ्या प्रमाणावर आढळून आले. अशाप्रकारे, धुळ्यातील एका चांगल्या पर्यटन स्थळावर साफसफाई मोहीम राबवून, महापौर प्रतिभाताई यांनी,जनतेसमोर एक स्वच्छतेचा संदेश दिला. या मोहीम मध्ये सहभागी झालेल्या, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे सर्व पोलीस कॉन्स्टेबल यांचे महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी आभार मानले.
लळींग किल्ल्यावर हि स्वच्छता मोहीम राबवत असतांना, किल्ल्यावर भरपूर प्रमाणात गवत आढळून आलं. येत्या काही दिवसांत, धुळेकर नागरिकांना लळींग किल्ल्यावर घेऊन जावुन, हे वाढलेले गवत काढण्याचा मनोदय, महापौर प्रतिभाताई चौधरी यांचा आहे. या अभियानात असंख्य धुळेकर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे नम्र आवाहन, महापौर प्रतिभाताई चौधरी ह्या येत्या काही दिवसांत करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *