डॉ. अनिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गांधली पिळोदे येथे आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न…..
![]()




डॉ. अनिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गांधली पिळोदे येथे आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न…..
गांधली- पिळोदे येथील बालाजी विद्यालयांमध्ये पिळोद्याचे सुपुत्र प्रसिद्ध सर्जन, खा. शि. मंडळ कार्याध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूसाहेब डॉ. अनिल नत्थू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य व मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात हृदयरोग, डायबिटीस, उच्च रक्तदाब, क्षयरोग, दमा, पोटाचे विकार, फिशर, मुळव्याध, हर्निया, कर्करोगाच्या गाठी, स्त्रियांच्या आजारा संदर्भातल्या समस्या, वंधत्व, गरोदर माता तपासणी, गर्भाशया संदर्भातील आजार, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया या व इतर आजारा संदर्भात मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन केले गेले. याशिवाय गोळ्या औषधींचे ही मोफत वाटप करण्यात आले. अंमळनेर तालुक्यातील गरजू,गरीब व निकडीच्या रुग्णांच्या 50% सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जातील असे डॉ. अनिल शिंदे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले. डॉ. अनिल शिंदे यांनी अमळनेर तालुक्याच्या गोरगरीब जनतेसाठी सेवेचा व्रत हाती घेतले आहे.आरोग्य संदर्भात अडचणी आल्यास हक्काने डॉ. अनिल शिंदे यांना भेटावे असे मत डॉ. मयुरी जोशी यांनी मांडले. संपूर्ण अमळनेर तालुक्यात अशा प्रकारचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉ. अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नर्मदा मेडिकल फाउंडेशन च्या वतीने घेऊन जनतेची सेवा केली जाईल असे प्रतिपादन डॉ. संदीप जोशी यांनी केले. या शिबिराद्वारे गांधली-पिळोदे गावातील 415 ग्रामस्थांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिराला आलेल्या लाभार्थ्यांची स्वतः
डॉ. अनिल शिंदे, डॉ. संदीप जोशी डॉ. मयुरी जोशी यांनी आरोग्य तपासणी केली. डॉ. परेश पाटील डॉ. जाकिर शेख डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. खुशवंत पाटील,संदीप पाटील, आर्जू सिस्टर, महेंद्र कोळी, योगेश पाटील, जब्बार पिंजारी, धीरज ठाकरे,सचिन पाटील गणेश पाटील, प्रमोद चौधरी, आकाश पाटील, माऊली पॉलीटेक्निकचे प्राचार्य कुणाल पाटील या नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या टीमने मोलाची कामगिरी केली. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पिळोद्याच्या सरपंच भारती पाटील, गांधली सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच पद्माबाई पारधी, गांधली उपसरपंच शिवदास पारधी, वि.का. सोसायटी, पिळोदे चेअरमन विलास कुलकर्णी, अनिल पवार, पुंडलिक कोळी,नितीन पवार, शांताराम पारधी,विकास पवार,प्रकाश पाटील,नरेंद्र पाटील, सुनील आप्पा पाटील,सुभाष पवार, सुभाष पाटील, सुधाकर आबा साळुंखे,दिनेश पवार, सुनील पाटील, गजेंद्र साळुंखे,किशोर पाटील, मोरे गुरुजी, तकदीर पिंजारी, अविनाश पवार,भगवान संदानशिव, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष पुखराज पवार, ग्रा.पं.सदस्यां जयाताई पाटील, आशाबाई कोळी,शबनम पिंजारी, कविता संदानशिव,तिलोत्तमा पवार,आत्माराम पाटील, गणेश पवार, एम जी पाटील सर, जितेंद्र पवार, प्रकाश निकुंभ, राजेंद्र निकुंभ, सेक्रेटरी आप्पा, आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पं. सदस्य आशिष शिंदे, डॉ. शिवाजी शिंदे, अंगणवाडी सेविका जनाबाई पवार,कल्पना वारुळे,छोट्याबाई पाटील,मदतनीस जयश्री बडगुजर ,शुभांगी पाटील,आशा वर्कस रेखाताई पवार,भावनाताई पवार ,सुरेखा पाटील,आरोग्य कर्मचारी,शाळेचे कर्मचारी राहुल पवार,भरत पवार, शेख मुसा, जितेंद्र पवार, निखिल सपकाळे आशिष निकुंभ, चेतन सूर्यवंशी,नागेश पाटील, ललित महाजन,लोकेश पाटील,योगेश पाटील, इरफान पिंजारी,कृष्णकांत महाजन,शुभम गुरव आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष शिंदे यांनी व आभार प्रदर्शन विलास कुलकर्णी यांनी केले.

