निष्कलंक-कर्तव्यापरी जाण असणारा,रुबाबदार होतकरू अधिकारी डॉ पकंज आशिया
![]()

एका प्रामाणिक अधिकाऱ्या विषयी, एक कर्मचाऱ्याचे मनोगत.
निष्कलंक-कर्तव्यापरी जाण असणारा,रुबाबदार होतकरू अधिकारी.
अधिकारी म्हटल्यावर कर्मचऱ्यामध्ये त्या अधिकाऱ्यांच्या पदाला, एक भीती असते, परंतु.. मा.डॉ.पंकज आशिया साहेब हे कर्मचारी असो वा अधिकारी यांच्या चांगल्या कामासाठी, त त्यांना चांगलीच पावती द्यायचे, चुकीच्या गोष्टींची त्यांनी कधीही पाठराखण केली नाही, त्यामुळे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गात कामकाजात देखील उत्साह वाढलेला असाल्याचा अनुभव दिसून येत होता,
ज्याप्रमाणे..
“चांगलं काम करणारा माणूस कधी सन्मान मागत नाही,
तर, त्याचं ते कार्यच हे त्याला सन्मानास पात्र बनवतं..!”
या सुविचारासाठी, मूर्तीवंत उदाहरण म्हणून… मा.पंकज आशिया यांच्या बद्दल बोलता येईल.
डॉ..पंकज आशिया साहेब …जळगाव जिल्हाच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने कोरून ठेवावे असे हे नाव..
शांत स्वभाव, साधी राहणी व उच्च विचारसरणी…
प्रत्येक विभागाची खडान खडा व इतमभूत अशी माहिती असणारा, एक कर्तव्यदक्ष व एक निष्कलंक असा प्रामाणिक अधिकारी…
वेळप्रसंगी आपल्या अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांची पाठराखण करणारा, एक दिलदार अधिकारी…
जळगाव जिल्ह्यात नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत, अहोरात्र काम करणारा उत्तम प्रशासक…
मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना, न्याय मिळावा म्हणून शेवटच्या दिवशी देखील सर्वात मोठी अनुकंपा भरती करणारे कर्तव्य दक्ष अधिकारी….
मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शिक्षकांची रिक्त असलेली पदे यासाठी अनुशेष भरून काढणारा अधिकारी….
आदरणीय साहेब आपण मागील तीन वर्षात जळगाव जिल्ह्यात बाला उपक्रम, शाळांसाठी भौतिक सुविधा पुरविणारा १६ कलमी कार्यक्रम असेल, शिक्षण स्वयंसेवक भरती असेल, विविध शालेय भौतिक सुविधा असतील, सोबतच सीईओ साहेबांनी इतर विभागात देखील आदर्श काम केले,
जसे की आमचे आरोग्य विभागातील केडर निहाय, १ली२री३री या कालबद्ध असतील,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,सेविकांचे पदोन्नती, तसेच विस्तार अधिकारी पदोन्नती असोत, त्यांनी पारदर्शक पणे मोठया प्रमाणात, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे 100% कामे मार्गी लावून,
जिल्हा परिषदच्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे,
सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्गाला न्याय देणारा अधिकारी म्हणजे डॉ.पंकज आशिया साहेब, असे सुवर्ण अक्षरात त्यांचे नावं कोरले जाईल.
त्याच्या या महान कार्य काळामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन डॉ.पंकज आशिया यांचे मी सम्पूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद मधील सर्व आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गामार्फ़त खूप खूप अभिनंदन व त्यांच्या कार्यास व त्यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून झालेल्या नियुक्तीसाठी,
तमाम कर्मचाऱ्यांमार्फत पुढील वाटचाली करिता, मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
मा.पंकज आशिया साहेबांच्या केलेल्या या निःस्वार्थ पणे केलेल्या कार्याला आमचा जळगाव जिल्हा कधीही विसरणार नाही..
सर्वात जास्त न्याय दिला असेल तर तो आमच्या आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी,
आदरणीय.साहेब आपल्या कार्याला मनापासून मानाचा👏😞मुजरा…
आपलाच पाईक
विजय योगराज देशमुख जिल्हाध्यक्ष
म.रा.जी.प.आरोग्य सेवा कर्मचारी २५७/८९ संघटना शाखा-जळगांव जिल्हा.

