1 min read

स्व. पंढरीनाथ भांडारकर आणि प्रा. र. का. केले फार्मसी महाविद्यालयास उत्कृष्ट मानांकन

Loading

स्व. पंढरीनाथ भांडारकर आणि प्रा. र. का. केले फार्मसी महाविद्यालयास उत्कृष्ट मानांकन
अमळनेर: खा. शि. मंडळ संचालित स्व. श्री. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, या महाविद्यालयातील डिप्लोमा फार्मसी विभागास उत्कृष्ट मानांकन प्राप्त झाले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळा, मुंबई यांच्या अकॅडेमिक मोनिटरिंग कमिटीने एप्रिल २०२३ मध्ये भेट देवून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, न्यू दिल्ही यांच्या मानकानुसार महाविद्यालयातील पायाभूत सुविधा जसे प्रयोगशाळा, वर्गखोल्या, कॉम्पुटर विभाग, विभागनिहाय असलेली उपकरणे, त्याचप्रमाणे लेक्चर, प्रक्टिकल, अंतर्गत परीक्षा, राबवलेले शैक्षणिक उपक्रम, प्राध्यापक, प्राध्यापाकेतर व कार्यालयीन कर्मचारीवर्ग यांचा आढावा घेतला. कमिटीच्या तपासणी अहवालानुसार महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळा, मुंबई याच्या कडून महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी उत्कृष्ट मानांकन प्रदान झाले आहे. मे-जुन २०२३ मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेतही डी. फार्मसीच्या दोन्ही वर्षाचा उत्कृष्ट निकाल लागला आहे.
महाविद्यालयाच्या या दुहेरी यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप जी अग्रवाल, फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन योगेश मुंदडे, हरी भिका वाणी, CA नीरज अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी, चिटणीस प्रा. डॉ. अरुण कोचर यांनी प्राचार्य प्रा.रवींद्र सोनवणे, डिप्लोमा फार्मसी विभाग प्रमुख प्रा. रविंद्र माळी, सर्व प्राध्यापक, प्राध्यापाकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *