1 min read

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांसह देवपुर  विटाभट्टी परिसरातील  शौचालय व नागरी समस्याची पाहणी करून  दुरुस्तीबाबत मनपा प्रशासनाला केले आदेश.

Loading

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांसह देवपुर  विटाभट्टी परिसरातील  शौचालय व नागरी समस्याची पाहणी करून  दुरुस्तीबाबत मनपा प्रशासनाला केले आदेश.

शहरातील प्रभाग क्रमांक ३ देवपूर विटाभट्टी परिसरातील सार्वजनिक महिला शौचालयाच्या पाण्याच्या टाकीवर अतिक्रमण झाले असल्याने तेथील मैला रस्त्यावर आला, तसेच शौचालयाच्या ठिकाणीचे आउटलेट गटारीकडे जाणारे पाणी निट वाहत नसल्याचे, शौचालय साफ होत नसल्याचे सदरील भागातील महिला व नागरीकांच्या तसेच देवपुर पूर्व मंडल अध्यक्ष सुबोध पाटील यांचीही महापौर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी सदर तक्रारीची तात्काळ दखल घेत सदर ठिकाणी आज दिनांक 22 जुलै 2023 रोजी सकाळी नऊ वाजता तातडीने मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासोबत पाहणी केली.
सदर शौचालयाची देखभाल व दुरुस्ती आस्था संस्थेकडे होती.
सदर संस्थेने शौचालयाची अवस्था अजून बिकट केली असल्याचे नागरिकांनी सांगितले. या शौचालयाच्या ठिकाणी होणारी अडचण इतर नागरिक यांनी केलेले अतिक्रमण त्वरित दूर करण्यासाठी आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग यांना त्वरित काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी सोबत आयुक्त श्री देविदास टेकाळे ,उपायुक्त श्री विजय सनेर, उप अभियंता प्रदीप चव्हाण,मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री वसावे, स्वच्छता निरीक्षक जाधव, चव्हाण, अतिक्रमण प्रमुख प्रसाद जाधव, स्वीय सहाय्यक संजय भंडारी,भाजपा देवपूर पूर्व मंडळाचे अध्यक्ष सुबोध पाटील, श्री हेमंत लोणारी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *