1 min read

जानवे गावाची सुकन्या कु. दामिनी पाटील यांची महाराष्ट्र मंत्रालयात लिपिक पदावर निवड झाल्याबद्दल साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे च्या वतीने सत्कार

Loading

जानवे गावाची सुकन्या कु. दामिनी पाटील यांची महाराष्ट्र मंत्रालयात लिपिक पदावर निवड झाल्याबद्दल साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रा. अशोक पवार सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. श्री. अनिल शिंदे , मा. केंद्र प्रमुख श्री भागवत गुरुजी, जानवे गावाच्या सरपंच सौ. सरला प्रकाश पाटील, उपसरपंच श्री गोपाल पाटील आणि गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष श्री डी एम पाटील सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्राम पंचायत सदस्य वकील बाबा, प्रकाश वाल्हे, कृष्णा रामदास पाटील, शरद साहेबराव पाटील, सुभाष जिभाऊ, शरद पाटील ग्राम पंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला किसान विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर व त्यांचे सहकारी कर्मचारी उपस्थित होते. समाज रत्न पुरस्कार प्राप्त बी.एन.पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश मनोरे सर यांनी केले व आभार विजय पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *