सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या मदतीने चाळीसगाव येथील हरहीर बाबा वस्ती येथे किशोरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन
![]()

सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या मदतीने चाळीसगाव येथील हरहीर बाबा वस्ती येथे किशोरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
आज दिनांक 18/7/2023 हरगीर बाबा वस्ती चाळीसगाव येथे किशोरी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पायल पवार. सौ विद्या चित्ते. सौ. सुचित्रा ताई पाटील. सौ. अश्विनी पाटील व गावातील इतर महिला किशोरी मुली उपस्थित होत्या.
या वस्तीतील साधारण ५० किशोरी मुलींना या उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
डॉ.पायल पवार यांनी किशोरी मुलींना योग्य ते मार्गदर्शन केले. मुलींना त्यांच्या आहार व शारीरिक व मानसिक बदलांविषयी खूप छान माहिती सांगितली. तसेच सौ विद्याताई चित्ते व सुचित्रा ताई पाटील यांनी पण मार्गदर्शन केले.

