1 min read

देवगांव देवळी हायस्कूलला निपूण चाचणी परीक्षा संदर्भात
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांची भेट..

Loading

देवगांव देवळी हायस्कूलला निपूण चाचणी परीक्षा संदर्भात
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांची भेट..

अमळनेर प्रतिनिधी-
निपुण भारत अंतर्गत निपुण चाचणी क्रमांक एक साठी अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल ला भेट देत इयत्ता आठवीतील निपुण चाचणी परीक्षेची पाहणी करत विद्यार्थ्यांची हितगुज साधला.
सविस्तर माहिती अशी की विश्वासराव पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अमळनेर यांनी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल ला भेट दिली असता त्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. गटशिक्षणाधिकारी पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय पोषण आहार, पटनोंदणी,विद्यार्थी
स्कॉलरशिप वाटप बाबत व विविध विषयांवर सविस्तर चर्चा करत शाळेतील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, शाळेचे शिक्षक आय.आर महाजन ,एस के महाजन, एच.ओ माळी, अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *