डॉ. विजय लाड यांना मसापचा पुरस्कार प्रदान
![]()

डाॅ. विजय लाड यांना मसापचा पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी ः
स.भ. डॉ. विजय लाड यांच्या ‘दासबोध चिंतन’ सार या ग्रंथाला २०२० सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मानाचा प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडचे योगेश बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह तसेच धनादेश रुपये सात हजारचा पुरस्कार माधवराव पटवर्धन सभागृह सदाशिव पेठ टिळक रोड पुणे येथे नुकताच वितरीत करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांसह समर्थ भक्त उपस्थित होते.

