1 min read

चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न….

Loading

चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न….
मुंबई प्रतिनिधी-संत सावता माळी महाराज समुद्रासारखे अफाट होते. त्या अफटपणाच्या जोरावर त्यांनी देव अगदी सोपा करून टाकला आणि साध्या साध्या माणसांना देव भेटवला…. असे प्रतिपादन मुंबई माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा. प्रकाश संतोष माळी यांनी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७२९ व्या पुण्यतिथीनिमित्त सोसायटी हॉल शास्त्रीनगर, वाशी नाका, चेंबूर येथे खान्देश मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉ.प्रा. प्रकाश संतोष माळी, सुनिल भाऊलाल महाजन व विष्णू रामचंद्र महाजन तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप भोजू महाजन यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाली. छबुलाल गणपत माळी यांनी सावता महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तसेच अमर भाई पाल, हरकभाई सिंग व शैलेश वेल्हे यांनी सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. या प्रसंगी माळी समाजातील बंधू-भगिनींसोबत इतर समाजातील बंधू-भगिनींनी देखील संत सावता महाराज यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी डॉ.प्रा. प्रकाश संतोष माळी व प्रा.सुनिल भाऊलाल महाजन यांनी सावता महाराजांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. यावेळी सौ. निर्मला पोपट महाजन, सौ. शिला सुरेश लोखंडे व सौ. कल्पना नामदेव महाजन दहिवद यांनी भक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन शशिकांत मोतीलाल महाजन तर आभार प्रदर्शन सुरेश पंडीत लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश पंडीत लोखंडे, वसंत नथ्थू माळी, दिलीप भोजू महाजन, जगन्नाथ दयाराम माळी, शशिकांत मोतीलाल महाजन, प्रकाश आनंदा महाजन, ज्ञानेश्वर छबुलाल माळी, जितेंद्र छबुलाल माळी, रविंद्र छबुलाल माळी, समाधान गोकुळ महाजन, विक्रम भगवान महाजन व भूषण नामदेव महाजन यांच्यासह सर्व युवक, युवती व भगिनींनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *