1 min read

राज्यातील शिक्षणाचा घसरणारा दर्जा व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेच्या शुभांगीताई पाटील यांची जळगांव शिक्षणाधिकारी यांच्या कडे बैठक.

Loading

राज्यातील शिक्षणाचा घसरणारा दर्जा व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेच्या शुभांगी ताई पाटील यांची जळगांव शिक्षणाधिकारी यांच्या कडे बैठक.

जळगांव दि,17
राज्यातील शिक्षणाचा दर्जा अ वरून ड वरून घसरला असून मागील गेल्या दहा वर्षापासून सुमारे पन्नास हजार शिक्षकांची भरती रखडल्याने शिक्षकांना अभावी शिक्षणाचा दर्जा घसरल्याचा आरोप करत आज शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची भेट घेत राज्यातील व जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा पाढा वाचला यामध्ये शिवसेनेच्या वतीने शुभांगी ताई पाटील यांनी शिक्षक भरती बाबत डीएड बीएड धारक शिक्षकांच्या भावना शासनाला पोहोचवाव्या अशी विनंती केली त्याच सोबत जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांवर देखील चर्चा करत शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवले ज्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील नव्याने 20 टक्के अनुदानास पात्र झालेल्या शिक्षकांचे अद्यापही शालार्थ आयडी मिळालेले नाहीत त्याबाबत तात्काळ कार्यवाही करून आदेश देण्याची मागणी केली त्यावर येत्या दोनच दिवसात आदेश देण्यात येतील अशी आश्वासन शिक्षणाधिकारी बच्छाव साहेब यांनी दिले तसेच तसेच त्यांच्या संच मान्यता प्रलंबित आहेत त्यांच्या संच मान्यता तात्काळ देण्यात याव्यात , अंशतः अनुदानित 20 टक्के 40 टक्के शाळांवरील शिक्षकांचे मागील सुमारे सात ते आठ महिन्यापासून मागील फरक मिळालेला नव्हता तो फरक तात्काळ मिळावा अशी मागणी केली व त्याबाबतही माननीय शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले तसेच जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षक कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल फरक बिल व सातव्या वेतन आयोगाचा फरक याच्या थकीत रकमा अदा करणे तसेच माध्यमिक शाळांच्या सातव्या वेतन आयोगाचा व मेडिकल बिलांचे प्रलंबित रकमा तात्काळ अदा करण्याची मागणी केली तसेच शिक्षकांचे व अंशतः अनुदानित शिक्षकांचे दर महिन्याला वेतन देण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून दर महिन्याला वेळेवर वेतन देण्यात यावे अशी मागणी केली याप्रसंगी राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्यासोबत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची जळगाव जिल्हा अध्यक्ष माध्यमिक विभागाचे निलेश वाघ सर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश जाधव सर तसेच निलेश पाटील सर , दिनेश साळूंखे, विजय चौधरी , सपना रावलानी,तायडे सर सपकाळे सर आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *