आत्मविश्वास, अभ्यास व कौशल्य गुण
जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे!
![]()
आत्मविश्वास, अभ्यास व कौशल्य गुण
जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे!
परीक्षा काळात विद्यार्थी अनेकदा मानसिक तणावात असतात. मानसिक तणावामुळेच विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या कमजोर होतो. डोकेदुखी, पित्त व डोळ्याचे विकार विद्यार्थ्यांना परीक्षा काळात जास्त प्रमाणात होतात यासाठी तणाव मुक्त जीवनशैली आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन मुंबईतील शाळांतील नामवंत समुपदेशक जयंती डाबरे मँडम यांनी केले.
हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा तणाव मुक्त कशा प्रकारे द्यायच्या या संदर्भात विशेष मार्गदर्शन समुपदेशक जयंती डाबरे मँडम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत शिक्षक व पालकांचा फार मोठा वाटा असतो यामुळेच परीक्षा काळातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक बदलांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी माहितीही समुपदेशन कार्यक्रमात दिली.
परीक्षा म्हणजे ज्ञानाची कसोटी असते व कोणत्याही कसोटीत कौशल्याची गरज असते यासाठी अभ्यास करत असताना कौशल्याने केल्यास व वेळेचे नियोजन केल्यास यश हमखास प्राप्त होते. यशासाठी परीश्रम व चिकाटी या गुणांची आवश्यकता असते व हेच गुण भविष्यात कामाला येतात. आत्मविश्वास, अभ्यास व कौशल्य त्याच बरोबरीने योग्य आहार यांच्या बरोबरीने मानसिक, शारीरिक स्वास्थ्य यामुळे परीक्षेतच नव्हे तर आयुष्यात यशस्वी होऊ शकतो याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शंका – कुशंका व प्रश्नोत्तरांनी कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी विज्ञान शिक्षिका मिताली मेहता व प्रयोग शाळा सहाय्यक हितेंद्र राठोड उपस्थीत होते.



