संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव राष्ट्रीय संत म्हणून घोषित करून संत नामदेव महाराज समाधी सोहळा शासकीय कार्यक्रम म्हणून घोषित करावा .. कल्याण ग्रामीण समस्त शिंपी समाजाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न ..
![]()
संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव राष्ट्रीय संत म्हणून घोषित करून संत नामदेव महाराज समाधी सोहळा शासकीय कार्यक्रम म्हणून घोषित करावा .. कल्याण ग्रामीण समस्त शिंपी समाजाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न .. शिंपी समाजातील तरुणांना उद्योग धंद्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊ::नरेंद्र पवार.. संपूर्ण शिंपी समाजाचे संघटन करून संत शिरोमणी नामदेव महाराज महामंडळ स्थापने साठी शासनाकडे पाठपुरावा करेल,.




ठाणे ( प्रतिनिधी ): संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ वा संजीवन समाधी सोहळा, आंबिवली शहाड, म्हारळ, टिटवाळा , कल्याण ग्रामीण समस्त शिंपी समाजाच्या वतीने, अखिल भारतीय शिंपी समाजाचे अध्यक्ष वणेशभाऊ खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली, माजी आमदार नरेंद्र पवार,राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष प्रा. सौ. सुषमाताई सावळे, अखिल भारतीय शिंपी समाजाचे युवा अध्यक्ष रुपेश बागुल, शिंपी समाजाचे विश्वस्त विजयनाना बिरारी, राष्ट्रीय सचिव प्रमोद शिंपी, खजिनदार किशोर कापडणे, कार्यालय प्रमुख जगताप सर, मा. महिला अध्यक्ष सौ. हर्षदा बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटीदार भवन, शहाड येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी, सचिव अशोक निकुंभ आणि खजिनदार म्हणून योगेश निकुंभ यांनी संपूर्ण समाज बांधवांना एकत्रित करून विजय खैरनार, बाळकृष्ण बाविस्कर, आणि विजय निकुंभ ,विजय पवार,राजस्थान नामदेव समाजाचे सचिव नटवर वर्मा यांचा मार्गदर्शनाखाली उत्कृष्ठ पने कार्यक्रमाचे नियोजन केले होते.संपूर्ण कार्यक्रमास विशेष म्हणजे ,ज्येष्ठ समाजसेवक, फोटोग्राफीचा व्यवसाय करत आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन ,समाजाप्रती आदराची भावना निर्माण करणारे आदरणीय दादासाहेब श्री. निळकंठ ओंकार निकुंभ यांनी संपूर्ण अन्नदान केले. सकाळी ७ वाजता संत नामदेव महाराज प्रतिमा पूजन,श्री. व सौ. दिपक बाविस्कर यांनी केले, आणि श्री.योगेश निळकंठ निकुंभ व सौ.उज्ज्वला योगेश निकुंभ यांनी सत्यनारायण पूजन केले.यानंतर , स्वरांगी भजनी मंडळ, आणि लक्ष्मी भजनी मंडळाने सुमधुर आवाजात टाळ मृदुंगाचा गजरात संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.भजनी महिला माउलींचे साडी देऊन पूजन करण्यात आले.तसेच पुरुष माउलींचे उपरणे आणि दक्षिणा देऊन पूजन केले. महिला आघाडीच्या मा.सचिव आणि आंबिवली शाखेचा स्थापनेपासून तर ग्रामीण भागात समाजामध्ये एकजूट निर्माण करणाऱ्या आदरणीय , सौ.मीनाक्षीताई खैरनार यांनी संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम, सूत्र संचलन, पूजेची तयारी, याबाबत काटेकोरपने नियोजन करून घेतले,. मा.आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की शिंपी मी लहानपणापासून शिंपी समाजाशी एकरूप आहे, आणि शिंपी समाजाचा, सहकार्यामुळेच मी आमदार म्हणून निवडून आलो होतो. तसेच शिंपी समाजातील युवकांसाठी बिनव्याजी कर्ज आणि उद्योगासाठी जागा देऊ,असे सांगत , शिंपी समाज सामुदायिक विवाह योजनेमध्ये १० जोडप्यांचा खर्च मी करेल असेही नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले, राष्ट्रीय सचिव प्रमोद शिंपी यांनी सांगितले की, शिंपी समाज संत नामदेव महाराज महामंडळ स्थापन करण्यासाठी शासनदरबारी निवेदन दिले असून त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे अशी पवार यांच्या कडे मागणी केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष वनेशभाऊ खैरनार यांनी आयोजकांनी खूप छान नियोजन केल्याबद्दल अभिनंदन केले,आणि सर्व समाज बंधू भगिनींनी एकत्र येऊन आपले समाज संघटन करावे असे आवाहन केले.तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव राष्ट्रीय संतांचा यादीत घेऊन संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळा (पुण्यतिथी) शासकीय कार्यक्रम म्हणून जाहीर करावे अशी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कडे केली. व पवारसाहेबांनी ही याबाबत लवकर बैठक घेऊन पुढील कारवाई त्वरित करण्यात येईल असे खात्रीशीर आश्वासन दिले आहे. या कार्यक्रमांत बालगोपाल यांनी सुंदर अश्या वेशभूषेत संतशिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवनावर आधारीत ऐकांकिका सादर करून सर्वांचे मनोरंजन केले. या बाल कलाकारांना प्रोत्साहन म्हणून रोटरी क्लब मिडटाऊन चे सचिव, समाजसेवक डॉ .किशोर अढळकर यांनी १००० रुपये रोख बक्षीस देऊन कौतुक केले.तसेच सर्व बालकलाकारांना शैक्षणिक साहित्य, समाजाचे हितचिंतक समाजसेवक रामेश्वर धाडणकर,स्थानिक अध्यक्ष बाळू बाविस्कर,ज्येष्ठ सल्लागार विजय निकम,मीनाक्षी खैरनार, महिला अध्यक्ष संगीता निकुंभ,अखिल भारतीय महिला उपाध्यक्ष सौ. अरुणा ताई ( नानी )बिरारी, सौ.संगीता शिंपी यांचे भेट देऊन अभिनंदन देण्यात आले. तसेच १०/१२ वित उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले . संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनिलाल शिंपी यांनी केले, तसेच आंबिवली टिटवाळा शहाड , म्हारळ परिसरातील सामाजिक कार्याची माहिती सौ. मीनाक्षी खैरनार यांनी दिली. संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी प्रकाश पुरषोत्तम खैरनार,गोरख जगताप, राजेंद्र इसई, संजय बोरसे, विजया निकुंभ, संगीता अशोक निकुंभ, बाळकृष्ण पवार, बाळू बाविस्कर, राजस्थान नामदेव समाज सचिव नटवर वर्मा, नामदेव समाजाचे प्रमुख सुरेश देवगिरीकर सत्यनारायण लूंडर, विश्वनाथजी, यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील,डॉ.किशोर अढळकर,पत्रकार श्रीनिवास शिरमिल्ले, आणि पत्रकार आचार्य सुरजपाल यादव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचाही राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार यांचा हस्ते शाल ,आणि संत नामदेव महाराज प्रतिमा देऊन स्वागत केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ठ असे शिस्तबद्ध सूत्रसंचालन सौ. मनिषा शिंपी, सौ.सोनाली शिंपी. आणि सौ.उज्ज्वला निकुंभ यांनी केले.नवनिर्वाचित सहसचिव योगेश निळकंठ निकुंभ यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि समाज माऊलींचे आभार मानले,पसायदान बोलून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

