1 min read

सागर सुकदेव कोळी यांना टोकरे कोळी युवा मंच तर्फे समाजरत्न पुरस्कार देऊन शहादा येथे सन्मानित

Loading

सागर सुकदेव कोळी यांना टोकरे कोळी युवा मंच तर्फे समाजरत्न पुरस्कार देऊन शहादा येथे सन्मानित

मूर्ती लहान कीर्ती महान असे व्यक्तिमत्व असलेल अमळनेर तालुक्यातील एक छोटस खेड्यातुन पाडळसरे गावाचा युवक सागर कोळी हे नेहमी समाजासाठी सामाजिक कामात अग्रेसर असतात सागर हा प्रताप कॉलेज अमळनेर येथे (एम ए ,राज्यशास्त्र) विषयात शिक्षण घेत आहे आदिवासी विकास संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष या पदावर देखील आहे व समाजातील विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करत असतात. आदिवासी मुलांना स्पर्धा परीक्षा, विषयी मार्गदर्शन व अनेक शिबिरात नेतृत्व सागर ने केले व स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडवला व इतरांना प्रेरणा देत असतो व मागील काळात त्याने समाजासाठी अनेक आंदोलनात उपोषणात तो सहभागी होता समाज बांधवाचे शेकडो जात प्रमाणपत्र मिळाले त्या साठी उपोषणात त्या ठिकाणी सुध्दा सागर सहभागी होता कारण समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे व समाजकार्यासाठी तत्पर असा युवक सागर कोळी अमळनेर तालुक्यातुन पुढे येत आहे व पुढेही सामाजिक कार्य साठी तत्पर राहिल व वेगवेगळ्या विषयावर पथनाट्य ही सादर केले व आपल्या अहिराणी भाषेतून अनेक कविता त्याने सादर केल्यात कार्यक्रमात व त्याचा यथोचित सन्मान देखील महाराष्ट्र भर झालेला आहे तर असे समाज उपयोगी कार्यक्रम तो घेत असतो समाजच काही तरी देणं लागतो ‘फुल नहीं फुलांची पाकडी’ म्हणून काम करणं हीच समाजसेवा. सागर हा बौद्धिक, श्रमदान, व्यक्तिमत्व विकास असे अनेक उपक्रम शिबिरात सहभागी होऊन समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच दिनांक 16 जुलै वार. रविवार रोजी टोकरे कोळी युवा मंच,शहादा तर्फे अन्नपूर्णा लाॅन्स,शहादा येथे सागर सुकदेव कोळी (पाडळसरे) यांना समाजरत्न पुरस्कार,मानाची शाल,पुष्पगुच्छ देऊन श्री.घुमन बाबुराव कोळी व सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व सागरचे प्रत्येक स्तरावरून कौतुक होत आहे व भविष्यातील गौरवशाली वाटचालीसाठी शुभेच्छा सागरला येत आहेत व पुढील वाटचालीसाठी व सामाजिक कार्य साठी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *