1 min read

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे 19 जुलैला नाशिक येथे राष्ट्रीय चिंतन बैठकीचे आयोजन : समाज संघटनासाठी उपस्थितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे आवाहन!

Loading

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे 19 जुलैला नाशिक येथे राष्ट्रीय चिंतन बैठकीचे आयोजन : समाज संघटनासाठी उपस्थितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे आवाहन!

(प्रा.भगवान जगदाळे : मराठी लाईव्ह न्यूज)

धुळे : समस्त माळी समाजाची सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रगती व्हावी समाज एकसंघ असावा, यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाची स्थापना करण्यात आली होती. मात्र अलीकडे माळी समाजामध्ये विविध संघटना निर्माण होऊन समाज विघटनाची प्रक्रिया अधिक जोरात आहे. यामुळे अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने विघटनांकडून संघटनेकडे असं ब्रीद घेऊन नाशिक येथे दिनांक 19 जुलै रोजी राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारणी तसेच, विभागीय, जिल्हाध्यक्ष व निमंत्रित सदस्य यांची संयुक्तिक चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या चिंतन बैठकीत उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रातील समाज व्यक्तींचा सहभाग असावा. यासाठी सर्व मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माळी महासंघाचे स्थापना चंद्रकांत पांढरे यांनी अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन केली होती या महासंघाची स्थापना मागे समाजाचे उत्थान व्हावे सामाजिक आर्थिक व शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लहान थोर व्यक्तींना सोबत घेऊन समाज परिवर्तनाच्या दृष्टीने काम करण्याचा व विकास करण्याचा हेतू होता आज स्थितीला नाशिक येथे होणाऱ्या चिंतन बैठकीत उपेक्षित दुर्लक्षित व पारंपारिक स्वरूपाच्या व्यवसायावर असलेले अवलंबित्व , समाजाची सांप्रत सामाजिक आर्थिक, राजकीय शैक्षणिक असलेली परिस्थिती शैक्षणिक व सहकार संस्थांमधील वर्चस्व सद्यस्थितीत असलेले समाजातील वकील डॉक्टर इंजिनीयर उद्योजक लेखक कवी पत्रकार संशोधक नाट्य सिनेमा साहित्य क्षेत्रातील कलाकार शेतकरी शेतमजूर यांचा सामाजिक कार्यात सहभाग व महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचारांचा वारसा समाजात पोहोचवणे इत्यादी विषयांवर लक्ष केंद्रित करून तात्कालिक व दीर्घकालीन अजेंडा प्राथमिक स्वरूपात तयार करण्याचा मानस आहे यासाठी प्रत्येक विभागीय स्तरावर वारंवार चिंतन बैठका घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने ह्या
चिंतन बैठकीचे आयोजन नाशिक येथील काशी माळी मंगल कार्यालय कन्नमवार तुला जवळ ट्रॅक्टरहाऊसच्या मागे, द्वारका तिग्रनिया रोड, नाशिक येथे दिनांक 19 जुलै, वार- बुधवार रोजी सकाळी 10 वाजता या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही चिंतन बैठक संपन्न होईल. या बैठकीसाठी मानद अध्यक्ष ऍड.संभाजीराव पगारे, माजी अध्यक्ष डी.के.माळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवदास महाजन, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजाभाऊ रायकर पुणे, राजाभाऊ काटे नाशिक, प्रा.रामचंद्र झगडे पुणे, राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा तारकाबाई सुभाष विवरेकर, राष्ट्रीय सचिव सुभाष सातव अकोला, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड अमरावती, श्रीमती प्रतिमाताई माळी शहादा, राजेश बोराटे फलटण, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड.राजेंद्र महाडोळे, यवतमाळ, तेलंगणा प्रदेशाध्यक्ष प्रा.सुकुमार पेटकुले, उत्तर प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीचंद वर्मा, राजस्थान प्रदेशाध्यक्ष रणछोडसिंग गहलोत, प्रीतम सिंग सैनी, जम्मू काश्मीर माळी युवा संघटना, बेंगलोरचे संरक्षण रुपेश सोलंकी, संतोष महाजन व लक्ष्मण महाजन बऱ्हाणपूर, रवी आढाव इंदोर, बाजीराव नाना तिडके नाशिक, सुधाकरभाऊ चौधरी सुरत, डॉ.शाम फुले सुरत, विजय राऊत नाशिक व मनोहर पाटील दोंदवाडा यांच्यासह
राष्ट्रीय कार्यकारिणी, प्रदेश कार्यकारणी, विभागीय व जिल्हाध्यक्ष तसेच निमंत्रित सदस्य या चिंतन बैठकीत उपस्थित राहतील ‌अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्षांचे सचिव काशिनाथ माळी व नाशिक विभागीय प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र गवळी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *