20% अनुदान पासून वंचित असलेल्या शाळां विषयी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची शिक्षण मंत्र्यांशी चर्चा
![]()

20% अनुदान पासून वंचित असलेल्या शाळां विषयी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची शिक्षण मंत्र्यांशी चर्चा
मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ) 6 फेब्रुवारी 2023 च्या आदेशानुसार नव्याने 20 % अनुदानावर आलेल्या व 20% वाढीव अनुदानापासून वंचित असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांच्या भावना शिक्षण मंत्री मा. नामदार श्री दीपकजी केसरकर साहेब यांच्या कानावर टाकून त्वरित न्याय मिळवून द्यावा, म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी मंत्री महोदयांची भेट घेतली. *सहा महिने उलटून गेले तरी सुद्धा शिक्षक शिक्षकांच्या खात्यात पगार जमा झाला नाही, शिक्षण अधिकाऱ्यांनी जावक नंबर जुळत नाही म्हणून, जी कार्यवाही करायला पाहिजे होती ती केलेली नाही , वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवले आहे असे सांगून अनुदान आदेश शाळांना वितरित केले नाही, खरे पाहता 6 फेब्रुवारीच्या शासन आदेशात वरिष्ठांचे मार्गदर्शन न मागवता, वस्तुस्थिती पाहून 11 मुद्द्यांच्या आधारे शाळांना अनुदान द्यावे असे स्पष्ट म्हटलेले आहे, तसेच पट असूनही ऑनलाइन संच मान्यतेत तांत्रिक अडचणी असल्याने सर्व विद्यार्थी दिसत नाहीत, त्यामुळे राज्यातील अनेक शाळा शिक्षक- शिक्षकेतर बांधव अनुदानापासून वंचित आहेत. अनुदान देऊन एकदाचा प्रश्न मिटवावा" अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी केली, त्यानुसा शिक्षण मंत्री मा. दीपकजी केसरकर साहेब यांनी शिक्षण आयुक्त यांना फोनवरून तात्काळ आदेश दिले , राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी तात्काल ऑनलाईन बैठक घेऊन दोन दिवसात मला माहिती पाहिजे असे सांगितले* तसेच दुर्गम , डोंगरी , सागरी भागातील कमी होत चाललेल्या पटसंख्येचे निकष शिथिल करावेत, उच्च माध्यमिक च्या वाढीव पदांना तात्काळ अनुदान द्यावे, 1 डिसेंबर 2022 विनाअनुदानावरून अनुदानावरच्या बदलीची स्थगिती उठवावी, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विनाअनुदानित तुकड्यांना इंग्रजी माध्यम शब्द परवानगी देताना वापरल्याने, अनुदान मिळालेले नाही, त्यांना अनुदान मिळावे, शिक्षकांची भरती त्वरित व्हावी, पवित्र पोर्टल तात्काळ सुरू करावे, अतिरिक्त शिक्षक मिळावेत, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करावे.
इत्यादी विषयांवर देखील चर्चा करण्यात आली अशी माहिती संपर्क प्रमुख विष्णू विशे यांनी दिली आहे.

