1 min read

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड काळाची गरज महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे प्रतिपादन देवपूर अमोल नगर येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

Loading

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड काळाची गरज महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे प्रतिपादन देवपूर अमोल नगर येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

आज अमोल नगर येथे महापौर – सौ. प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
धुळे.- पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत पुणे,महाराष्ट्र, शाखा.धुळे.तर्फे
दि.१६ जुलै.२०२३ रोजी अमोल नगर देवपुर धुळे येथे वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा धुळे महानगर पालिका महापौर सौ. प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी होत्या. मनोगत व्यक्त करताना सांगितले की करोना काळात ऑक्सिजनची किती आवश्यकता होती हे जनतेच्या त्यावेळी लक्षात आले असेल म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे व जगवावे असे त्यांनी सांगितले त्यांचा छोटेखानी सत्कार सौ.किरण प्रकाश सुर्यवंशी यांनी केला. तसेच महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते वृक्षाची रोपे लागवड केली. यात वड, पिंपळ,लिंब,जांभुळ, बेल या झाडाची रोपे ओपन स्पेस मध्ये व रस्त्याला लागून रोपे लावण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र डोढरे सर यांनी केले. पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे धुळे शाखेचे पदाधिकारी गोकुळ देवरे,नरेंद्र सोनवणे सर,संदिप बागल, डॉ.प्रा.ममता सोनवणे, डॉ.प्रा.प्रिया कुरकुरे,नलिनी दुसाने,तसेच या वेळी कॉलनी परिसरातील नागरिक विनायक श्रीपतराव देवरे,माधवराव फकिरा माळी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा.श्री. सागर चौधरी,जवाहर पाटील,राहुल विनायकराव पाटील,रमेश देवरे,संजय भिवसन शिंदे,भिकन भामरे सर,शिवाजी पाटील,चेतन सुर्यवंशी,सौ.नयनतारा सुर्यवंशी, मनिषा दिवान पवार,सौ.सुचिता भिकन ब भामरे,भारती देवरे,सौ.आक्काबाई माधवराव माळी,शितल देवरे,मनिषा भामरे,शितल आबा येवले.महिला वर्ग मोठ्या संख्येने ऊपस्थित होत्या सूत्रसंचालन जेष्ठ नागरिक प्रकाश पाटीलसर (सुर्यवंशी) यांनी केले.
आभार प्रदर्शन राहुल पाटील यांनी केले.
यावेळी परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *