1 min read

चांद्रयानने झेप घेताच स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष

Loading

चांद्रयानने झेप घेताच स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष

मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) चांद्रयन ३ ने अवकाशात झेप घेताच चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम चा जयघोष करत एकच जल्लोष केल
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण आज श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला
तत्पूर्वी आज शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सकाळ व दुपार अधिवेशनातील ११८४ विद्यार्थ्यांना दैनंदिन परिपाठात चांद्रयान ३ ची निर्मिती कशी झाली, त्याचा भारत देशाला होणारा फायदा, तसेच इस्रो ने तरुण संशोधकांच्या मदतीने काही भाग वगळता संपूर्ण भारतीय बनावटीच्या चांद्रयन ३ ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली त्यानंतर वर्गामधील डिजिटल प्रोजेक्टर वर याचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
थेट प्रक्षेपण सुरू असतांना विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत व पाहत होते.भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य,अनिल बोरनारे यांनी यावेळी विद्यार्थ्याना विशेष माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *