चांद्रयान-3 प्रेक्षपणाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
![]()



चांद्रयान-3 प्रेक्षपणाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
चांद्रयान-३’च्या प्रक्षेपणाच्या काउंटडाउनला श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावर सुरुवात झाली. सुमारे २५ तासांच्या पूर्वतयारीमध्ये लाँच वेहिकल मार्क ३ (एलव्हीएम ३) या रॉकेटच्या विविध यंत्रणांची कसून तपासणी झाली असून, रॉकेटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी द्रव इंधन भरण्याची प्रक्रियाही पूर्ण केली. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण आज, शुक्रवारी (१४ जुलै) श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी प्रक्षेपण दाखविण्यात आले..
विद्यार्थ्यांना देशातील घडामोडींचे भौगोलिक ज्ञान व्हावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासो प्रा.डॉ संजय सोनवणे, सचीव बापूसौ विजय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रोजेक्टरची व्यवस्था करुन दिली.
आज दिनांक 14/07/2023 रोजी कै.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवस येथे विद्यार्थ्यांना चांद्रयान -3 चे दुपारी 2.35 ला होणारे प्रक्षेपण शाळेतील प्रोजेक्टर ने दाखविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी चंद्रयान-3 अभियान या वैज्ञानिक कुतूहलाचा खूप आनंद घेतला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले..
सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात आनंद घेतला..

