एम.एस्सी गणित विषयात, परीवर्धे सारख्या खेडेगावातील,कन्या कु.वैष्णवी शिंपी हीचे घवघवीत यश.
![]()

एम.एस्सी गणित विषयात, परीवर्धे सारख्या खेडेगावातील,कन्या कु.वैष्णवी शिंपी हीचे घवघवीत यश.
शहादा( प्रतिनिधी )::: कवयत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ अंतर्गत ,पूज्य सानेगुरुजी महाविद्यालय लोणखेडा , तालुका शहादा येथे गणित विभागात मास्टर ऑफ सायन्स ( एम. एस्सी ) परिक्षेत कू.वैष्णवी शिंपी हिने ७० टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे.सविस्तर वृत्त असे की, परीवर्धे,तालुका शहादा,जिल्हा नंदूरबार येथील आदरणीय दादा साहेब रतिलाल रामदास शिंपी व सौ लीलाबाई शिंपी यांची नात आणि
आपलेच समाज बांधव.सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभागातील सुपर वायझर,
श्री.संजय रतिलाल शिंपी, सौ.कल्पना संजय शिंपी. ( निकुंभ ) यांची कन्या,
कु.वैष्णवी शिंपी हिने एम. एस्सी ( maths) फाईनल परीक्षेत ७० टक्के गुण मिळवत घव-घवीत यश संपादन केले. त्याबद्दल वैष्णवी आणि आई-वडिलांचे तसेच निकुंभ परीवार यांचे शिंपी समाजातर्फे
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. देण्यात येत आहेत.कुमारी-‘वैष्णवी संजय शिंपी..
अजब प्रेमळ, शांत स्वभाव, हुशार व्यक्तीमत्व.
*कु.वैष्णवी संजय शिंपी… हिला आजोबा श्री. रतिलाल रामदास शिंपी,आज वयाचे ७५ वर्ष पूर्ण झाले तरीही त्याच जोमाने शिवणकाम करून आपल्या नातावडांचा शिक्षणासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. तसेच मानवसेवा हीचं खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर, डॉ.मनिलाल शिंपी,सौ. संगिता शिंपी,सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( काका काकू) यांचा आशिर्वादाने आज वैष्णवी हिने यश मिळवले आणि आईवडील, अजी आजोबा, आणि काकांचे स्वप्न साकार करत आहे.
कठीण परिश्रम करून जीवन प्रवास करताना..वडिल संजय रतिलाल शिंपी,(सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभागातील सुपर वायझर,पदाची जबाबदारी सांभाळत, बऱ्याच अडचणींना तोंड देत जिद्द सोडली नाही.आई कल्पना शिंपी यांनीही मुलांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले.आणि आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित करण्यात महत्वाची जबाबदारी पूर्ण केली.
*तुझे किती कौतुक करावे तितके कमीच आहे…*
तु शिक्षण क्षेत्रात तज्ञ व गाढे अभ्यासक…ज्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करते आशा या…
कुमारी- वैष्णवी शिंपी…
समाजात नाव दूर-दूर पर्यंत नाव लौकिक केले. आम्हांला व समाजाला सार्थ अभिमान आहे…
आपली भावी शैक्षणिक वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा…हीच
*म्हाळसा-देवी मातास ईश्वर चरणी प्रार्थना…
*”मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी, 💐कार्यवाहक ,आणि दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील.स्वामीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दिनेशभाई ठक्कर, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक डॉ.रामचंद्र देसले,भिवंडी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, पोलीस पाटील श्री.सोमनाथ ठाकरे,यांच्याकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.आणि भावी आयुष्यातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.तसेच परिवर्धे परसरातील मित्रपरिवारकडून देखील अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

