1 min read

अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविकाच्या मागण्यांबाबत सकारात्मक- मंत्री मा.अनिल पाटील

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविकाच्या मागण्यांबाबत सकारात्मक- मंत्री मा.अनिल दादा पाटील
आमदार मा.श्री.अनिल दादा पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर पहिल्यांदाच अमळनेरात आल्यानंतर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांच्या निवास स्थानी भेट घेऊन सत्कार केला आणि अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविकाच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर केली.
यावर मंत्री मा.अनिल दादा पाटील यांनी गावपातळीवर घराघरांत आरोग्य सेवा पुरविणाऱ्या आणि कुपोषण दूर करण्याचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकाच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक विचार करुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.असे आश्वासन मंत्री मा.अनिल दादा पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.
रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधी श्रीमती सरला पाटील,वंदना पाटील,सुनिता नेतकर तसेच आशा स्वयंसेविका संघटनेच्या तालुकाध्यक्ष श्रीमती सुनंदा पाटील यांनी भागिदारी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *