1 min read

ग्रामसेविका कविता साळुखे यांची आरएमबीकेएस कर्मचारी संघटनेच्या च्या जिल्हा कार्यकारिणीवर….

Loading

ग्रामसेविका कविता साळुखे यांची आरएमबीकेएस कर्मचारी संघटनेच्या च्या जिल्हा कार्यकारिणीत झाली निवड

अमळनेर प्रतिनिधी-,येथील ग्रामसेविका कविता साळुंखे यांची कामगार ट्रेड युनियन आरएमबीकेएस च्या जिल्हा कार्यकारणीत लागली वर्णी.

आरएमबीकेएस या नोंदणीकृत कामगार ट्रेड युनियनचे जिल्हा अध्यक्ष आनंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर येथील प्रबुद्ध विहारात झालेल्या बैठकीत आदर्श ग्रामसेविका पुरस्कार प्राप्त कविता साळुंखे यांची कर्मचारी वर्गा विषयी असलेले कायदेशीर ज्ञान व संघटन कौशल्य पाहता त्यांना कामगार संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीत समाविष्ट करण्यात आले असून लवकरच त्यानां संघटनात्मक मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच जाधव यांनी केले तर त्यांना आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना कविता साळुंखे सांगितले की,खाजगीकरणाच्या वाऱ्याने अनेक शासकीय कर्मचाऱ्यांवर गंडांतर येणार असून यासाठी आरएमबीकेएस या नोंदणीकृत कामगार ट्रेड युनियनच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे केले जाईल.कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कायदेशीर लढा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्च्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजी पाटील,प्रोटॉन चे जिल्हा महासचिव मिलिंद निकम,प्रकाश इंगळे,कमलाकर संदानशिव,देविदास घोडेस्वार,आतिश बिऱ्हाडे,दिपक बिऱ्हाडे,राजू मोरे,अजय भामरे,विजय वाडेकर,किरण मोहिते,ज्ञानेश्वर निकम यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *