पोदार जंबो किड्स, अमळनेर च्या बालकांनी विद्याविहार कॉलनीतील कल्याण मारुती मंदिर परिसरात केले वृक्षारोपण…
![]()
वृक्षारोपण करण्यापेक्षा त्याचे संवर्धन महत्त्वाचे
निलिमा कुडे



पोदार जंबो किड्स, अमळनेर च्या बालकांनी विद्याविहार कॉलनीतील कल्याण मारुती मंदिर परिसरात केले वृक्षारोपण…
वृक्षारोपण करण्यापेक्षा त्याचे संवर्धन महत्त्वाचे
निलिमा कुडे
अमळनेर प्रतिनिधी-पोदार जंम्बो किड्स अमळनेर च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेलाच वाव देतातच पण यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण व्हावे म्हणून वृक्षारोपणही केले जाते…
सविस्तर माहिती अशी की पोदार जंबो किड्स, अमळनेर च्या बालकांनी आज विद्याविहार कॉलनीतील कल्याण मारुती मंदिर परिसरात वृक्षारोपण केले त्यात बेल, वड, पिंपळ, व औदुंबर ची झाडे लावण्यात आली तसेच मुलांना झाडांबद्दल माहिती सांगण्यात आली. तसेच वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले ह्या साठी शाळेच्या संचालिका सौ.निलिमा कुडे , व शिक्षिका सौ श्रुती विजय पाटील व सौ. जयश्री पाटील,सामाजिक कार्यकर्ते व भावी नगरसेवक रवींद्र पाटील यांची पत्नी सौ. भावना रवी पाटील यांचे सहकार्य लाभले तसेच पालक सौ शीतल संदानशीव यांचीही उपस्थिती लाभली..

