1 min read

हिंदू,मुस्लिमांनी धर्मांधतेच्या बाहेर पडत माणूस जोडला पाहिजे
मुकुंद सपकाळे

Loading

हिंदू,मुस्लिमांनी धर्मांधतेच्या बाहेर पडत माणूस जोडला पाहिजे
मुकुंद सपकाळे

भारतीय समाज व्यवस्थेतल्या धर्म जाती आणि पंथ यासोबतच हिंदू मुसलमानांनी धर्मांधतेच्या बाहेर पडत माणूस जोडला पाहिजे या माणूस जोडण्यातून हा देश एक संघ अखंडित राहून जगाला दिशा देण्याचे काम करू शकतो ही दिशा माणूस एकत्रित आणण्याच्या संकल्पनेतूनच साथ देऊन शकत असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी पीस अँड जस्टीस मुव्हमेंट यांनी आयोजित केलेल्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुव्हमेंटचे राज्यसचिव हुसेन खान हे होते तर डॉ. मिलिंद बागुल आदिल खान, मुस्ताक सर, मोहम्मद झकेरीया, मोहम्मद सामी इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते याप्रसंगी बोलताना डॉ. मिलिंद बागुल यांनी भारत या देशाची आणि संस्कृतीची भारतीय संविधानाने एक स्वतंत्र ओळख निर्माण करत व्यक्तीला माणसाला महत्त्व दिलेले आहे अनेक लोक मिळून तयार झालेला हा देश जाती, धर्म या पलीकडे ओळख असणारा देश असून यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आपल्या देशाला जागतिक स्तरावर नावलौकिक प्राप्त करून देण्याकरता प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष हुसेन खान यांनी देशाची शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण टिकून ठेवण्यासाठी आपल्याला शिक्षणासोबतच भारतीय संविधान अंगीकारण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष आदिल खान यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *