ठाणे पे युनिट कार्यालयाचे प्लॅस्टर कोसळले,कार्यालय तातडीने शिफ्ट करा- अनिल बोरनारे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
![]()


ठाणे पे युनिट कार्यालयाचे प्लॅस्टर कोसळले
कार्यालय तातडीने शिफ्ट करा- अनिल बोरनारे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी .
मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) ठाणे जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह निधी (पे युनिट) कार्यालयाचे प्लॅस्टर कोसळले सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नसून हे कार्यालय तातडीने स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री शिक्षण संचालक व मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे
काल संध्याकाळी साडेचार वाजता कार्यालयाच्या छताचे प्लॅस्टर खाली कोसळले सुदैवाने कोणाच्या डोक्यावर न पडल्याने मोठा अनर्थ टळला तरीदेखील कार्यालयातील संगणक व इतर वस्तूंची नासधूस झाली आहे
ठाणे स्टेशन जवळील खंडेलवाल स्वीटच्या वरती हे कार्यालय असून ठाणे जिल्ह्यातील ४१९ खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांमधील तीन हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन तसेच भविष्य निर्वाह निधी व इतर भत्ते देण्याबाबतचे कामे या कार्यालयामार्फत केले जाते त्यामुळे या कार्यालयात शिक्षक व शिक्षकेतरांची मोठी वर्दळ असते.
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयात प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी अन्य ठिकाणी हे कार्यालय स्थलांतरित करावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे.

