रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांचे शैक्षणिक प्रश्न सुटावेत म्हणून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा रत्नागिरी झंजावती दौरा
![]()
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांचे शैक्षणिक प्रश्न सुटावेत म्हणून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा रत्नागिरी झंजावती दौरा
शिक्षणाधिकारी यांच्या समवेत जिल्ह्यातील शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी बैठक
विविध शाळांच्या मुख्याध्यापक शिक्षक संस्थाचालकांकडून आमदारांचे स्वागत.
शिक्षक- शिक्षकेतरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव यश मिळो गणपतीपुळे येथे गणपतीचे दर्शन घेऊन साकडे

मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ):आज दिनांक 5 जुलै 2023 रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांची शिक्षक शिक्षकांची प्रलंबित शैक्षणिक कामे पूर्ण व्हावीत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर निकाल पासून खेड ,दापोली , गुहागर , गणपतीपुळे, रत्नागिरी मधील अनेक मुख्याध्यापक, संस्थाचालक,शिक्षक- शिक्षकेतर बंधू-भगिनींच्या भेटी घेऊन , संवाद साधला व प्रलंबित कामांची माहिती घेऊन आज रत्नागिरी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी लेखा अधिकारी, पे युनिट अधीक्षक यांच्या समवेत बैठक घेतली
1) अनेक वर्षापासून विविध प्रकारची देयके प्रलंबित आहेत , 1 महिन्याच्या आत सर्व देखे मंजूर करून संबंधीच्या खात्यामध्ये पैसे जमण्या करण्याची सूचना आमदारांनी दिल्या.
2) आरटीइ पुनर मान्यता मान्यता सर्व शाळांना आदेश द्यावेत
3) शैक्षणिक कामा निमित्त शिक्षण विभागामध्ये येणाऱ्या मुख्याध्यापक ,संस्थाचालक, शिक्षकांना सन्मानाची वर्तणूक मिळाली पाहिजे
4) अनुकंपा मान्यता ,मुख्याध्यापक पर्यवेक्षक मान्यता त्वरित द्याव्या
5) फाईल ,हरवणे, गहाळ करणे वारंवार त्रुटी काढणे तात्काळ थांबवावे.
6)इयत्ता पाचवी व आठवी जिल्हा परिषद ने सुरु केले वर्ग बंद करणे
7 ) अंशतःअनुदानित सर्व शाळांना अनुदानाचे आदेश देणे बाबत
8)फायनल संच मान्यता मिळणे बाबत
9) रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे त्याबाबत चर्चा
10) वेतनेतरअनुदान, तसेच ठोक मानधनावर नेमलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मानधन मिळावे, कधी कमी पडत असल्यास शासनाकडे निधी मागितल्याची आमदार महोदयांकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील
11) रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने , अनेक कामे प्रलंबित राहत आहेत याचा विचार करून शासनाकडे कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी आमदार महोदय प्रयत्न करणार आहेत
तसेच उपस्थित विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाचालकांनी आणलेले सर्व प्रश्न 1 महिन्याच्या आत सोडवण्याचे आदेश आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिले,
मीटिंगचे संपूर्ण इतिवृत्त लिखित स्वरूपात मिळावे, जी जी कामे आमदार महोदयांच्या मार्फत दिली असतील त्यांचे निराकरण 15 दिवसात झालेच पाहिजे असे आदेश दिले
रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदाच धडाकेबाज सभा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्यांदाच घेतल्याने बैठकीसाठी उपस्थित सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे

