शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व आण्णासाहेब योगेश महाजन…
![]()

शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व योगेश महाजन…
ज्ञानाने माणूस मोठा होता असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित,परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथील संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब योगेश महाजन….
धैर्य, अविरत मेहनत, सत्यता, कमालीची बुद्धिमत्ता, ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा, या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव ,कोणत्याही परिस्थितीत हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्व या परमेश्वराने बहाल केलेल्या अनमोल गुणांचे तेजोमय व्यक्तिमत्व म्हणजे आण्णासाहेब योगेशजी महाजन…
मा.आण्णासाहेब.योगेश रघुनाथ महाजन सर
अध्यक्ष – चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित,
- परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा
- स्पेशल डि.एड.(आयडीडी) कॉलेज पारोळा
- मंजुश्री डि.एम.एल.टी & पॅरामेडिकल कॉलेज पारोळा
दि.२७/०४/२००५ पासुन विनाअनुदानित तत्त्वावर दिव्यांग (अनाथ, मतिमंद) एकुण ६६ मुला मुलींसाठी निवासी शाळा चालवित आहेत. मुलांच्या दोन वेळच्या जेवणासाठी, गावात , किराणा दुकान, दारोदारी धान्य मागण्यासाठी भटकंती करावी लागत होती.ही विशेष मुले,भिक मांगतांना, उकिरड्यावर उष्टे अन्न खाताना, साखळीला बांधलेले, असे विद्यार्थी सोडवुन स्वताच्या हिमतीने विशेष शाळेत दाखल केलेत.यासाठी चप्पल, शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक,अव्हेलना सहन केली.आणि म्हणुनच”स्वताला गाडुन घेऊन दुखीताना उगवणारे योगेश महाजन सर यांचे कार्य ‘ बघण्यासाठी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ,डॉ.प्रकाश आमटे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आर.सी.बाफना, अशोक भाऊ जैन, निलिमाताई मिश्रा भेट देऊन मनोबल वाढविले.या दिव्यांग मुला मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर बनवणे हाच मानस उराशी बाळगून हे कार्य सुरू आहे.
आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द…..
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा आज आण्णासाहेब यांचा वाढदिवस. ……
शुभेच्छुक
मनिष जाधव
मुख्याध्यापक
परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव सर्व विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद…

