1 min read

मोराने उपनगर येथे महिला बचत गट सदस्य यांचा मेळावा संपन्न…

Loading

दिनांक 04.07.2023 रोजी मोराने उपनगर येथे महिला बचत गट सदस्य यांचा मेळावा संपन्न झाला.सभेत महानगरपालिका शहरी उपजीविका अभियान बचत गट विभागातील समुदाय संघटक सुनीता निकम मॅडम यांनी बँक कर्ज,रोजगार निर्मिती,,बँकेचे व्यवहार,बचत महत्व,सामाजिक उपक्रम यावर माहिती दिली.समृध्दी फाऊंडेशन अध्यक्ष श्री विजय ठाणकर यांनी शासकीय योजना यावर मार्गदर्शन केले.सदर सभेत बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोराने उपनगर येथील बचत गट समुदाय संसाधन व्यक्ती अक्काबाई पाटील यांनी आभार व्यक्त केले. सदर महिला सभा समृध्दी फाऊंडेशन कार्यालय मोराने उपनगर येथे संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *