1 min read

संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..

Loading

संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..

अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील दादासाहेब जी.एम. सोनारनगर येथील भाविकांचे श्रध्दास्थान संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
सकाळी मंदिरात सकाळी आरती झाली. सकाळी 8 वाजेला लघुरुद्र अभिषेक झाला. मारवड ते अमळनेर पायीवारी चे 12 वाजेला आगमन झालं त्यांचे स्वागत संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार, सौ ज्योती पवार ,मा.प्राचार्य एल.जे.चौधरी
व गजानन महाराज परिवारातील बंधू व भगिनी यांनी दिंडीचे स्वागत केले. पालखी ची आरती होऊन महाप्रसाद चा कार्यक्रम झाला.अमळनेर शहरातील व ग्रामीण भागातील भाविकांनी महाप्रसादचा आनंद घेतला.
गुरुपौर्णिमा निमित्ताने गजानन महाराज परीवारातील बंधू व भगिनींनी एकमेकांना शुभेच्छा देत जेष्टाचा आशिर्वाद घेतला.
सदर कार्यक्रमासाठी सहकार्य श्रीकृष्ण चव्हाण,महेश साळुंखे,संजय साळुंखे, विजय येवले, संजय पाटील,परेश पाटील, प्रविण पवार, निकुंभ साहेब, चेतन उपासणी, नितीन भावे, प्रदीप चौधरी, एल. जे. चौधरी यांचे सहकार्य आणि महिला ज्योती पवार, हिना पाटील, कल्पना पाटील, शोभा कोळी, खोंडेताई, संगीता पाटील नितल पाटील, रेवा पाटील
सह गजानन परिवारातील बंधू भगिनींनी सहकार्य केले.

संत गजानन महाराज सेवा संस्थांच्या विश्वस्त प्रताप वारी प्रमुख सौ ज्योती पवार अऔक्षण करतांना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *