गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर हभप डॉ रविंद्रजी भोळे सन्मानित
![]()

गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर हभप डॉ रविंद्रजी भोळे सन्मानित
शिंदवणे रोड उरुळी कांचन: गुरुपौर्णिमा साजरी करणे म्हणजे धर्मातील विविध ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा आदर करणे सन्मान करणे होय. ह्या दिवशी परमेश्वर शिवाने दक्षिण मूर्ती रुपात सर्व मुनी शिष्यांना शिवाचे ब्रह्मज्ञान प्रदान केले. त्यामुळे ऋषीमुनींना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. अति प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा ही आपल्या भारतामध्ये सुरू आहे . अजूनही विविध कार्यक्रमाद्वारे या परंपरेचे जतन करणे सुरू आहे. गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर परिसरात अनेक उपक्रम घेण्यात आले. याप्रसंगी शिंदवणे येथील सामाजिक कार्यकर्ते टी. के. महाडिक युवा नेते यांनी ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक ,प्रबोधनकार ह भ प डॉ.रवींद्र जी भोळे यांना शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब महाडिक दैनिक सामना, अमोलजी भोसले दैनिक केसरी पत्रकार, कैलास पिंगळे अध्यक्ष मानसन्मान फाउंडेशन, निखिल दत्तात्रय टिळे उपाध्यक्ष मानसन्मान फाउंडेशन व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

