सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी…
![]()

गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी
अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्राचार्या गायत्री भदाणे मॅडम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत मॅडम, व्ही सी पाटील सर, एन बी खंडारे सर, जी पी हडपे सर, उमेश काटे सर, लता पवार मॅडम, नीलिमा पाटील मॅडम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गायत्री भदाणे मॅडम, कल्पना महंत मॅडम व जी पी हडपे सर यांनी गुरुचे महत्व विशद केले. विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी वकृत्व स्पर्धाही घेण्यात आली.यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थिनींची स्मरण शक्ती वाढावी यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यातील यशस्वी विद्यार्थिनींना उमेश काटे सरांकडून बक्षीसे देण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त दहावीच्या विद्यार्थिनींकडून गुरुजनांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. जेष्ठ शिक्षक व्ही सी पाटील सर व जी पी हडपे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे सर यांनी प्रास्ताविक केले. दहावीच्या विद्यार्थिनीं भाविका पाटील व खुशी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रिद्धी पाटील हिने आभार प्रदर्शन केले. नंदिनी राजपूत हिने छायाचित्रण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप मनुरे, सतीश बाविस्कर, प्रवीण उशीर आदी सह दहावीच्या विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थिनी…
वकृत्व स्पर्धा (पाचवी ते सातवी गट) प्रथम- देवयानी पाटील, द्वितीय-शिवानी पाटील, तृतीय- हर्षाली पाटील
(आठवी ते दहावी गट) प्रथम – कनिष्का पाटील, द्वितीय- दिव्या पाटील, तृतीय- प्रतीक्षा पाटील व दुर्गेश्वरी पाटील
प्रश्नमंजुषा स्पर्धा- हेमलता पाटील, तनुजा पाटील, दिव्या पाटील या सर्व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील साहेब, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील सर, प्रशासकीय अधिकारी प्रा शाम पवार, शिक्षण मानद संचालक प्रा सुनील गरुड सर आदींनी अभिनंदन केले आहे.

