1 min read

स्व.श्री.एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयात ‘गुरुपौर्णिमा ‘ साजरी

Loading


गुरू ने दिला ज्ञानरुपी वसा !!
आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुःसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नम: ॥

आज स्व.श्री.एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयात ‘गुरुपौर्णिमा ‘ साजरी करण्यात आली.
काही विद्यार्थ्यांनी गुरूपोणिमेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तर काही विद्यार्थ्यीनींनी आई -वडील व गुरु वर आधारित गीत म्हटली.
विद्यार्थ्यांनी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुरू पोणिंमे निमित्ताने गुलाब पुष्प देवून सत्कार केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मुख्याध्यापक श्री धनराज महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना गुरुपोणिंमेचे महत्त्व सांगितले. तर किशोर पाटील सर व सुनिल पाटील सर यांनी प्रत्येकाच्या जिवनात असलेल्या गुरुंच्या महत्त्वाविषयी व गुरुपोणिंमेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ.10 वी ची विद्यार्थीनी भुमिका अहिरे हीने केले. तर आभार इ.9 वी ची विद्यार्थीनी गायत्री चौधरी हिने मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *